घरमहाराष्ट्रMPSC Exam: एमपीएससी परीक्षा रद्द होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

MPSC Exam: एमपीएससी परीक्षा रद्द होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

Subscribe

रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ ला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेबाबच मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाही एमपीएससी परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होणार असे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. मात्र विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परिक्षांबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीत परीक्षेची तारीख बदलणार का? याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे?  विद्यार्थी परीक्षा ढकलण्याची मागणी का करत आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नेमकी भूमिका काय? मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

दरम्यान एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली आहे. याआधी देखील कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने २०२० मधील एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती. परंतु विद्यार्थ्यांनी राज्यभरात जोरदार आंदोलने करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला. यानंतर सरकारने एमपीएससी परीक्षा घेण्याबाबत नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर केले, यावर गेल्या महिन्यात २१ मार्चला एमपीएससीची पूर्वपरीक्षा घेण्यात आली. दरम्यान विकेंड लॉकडाऊनमध्येही एमपीएससी परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच होणार असे एमपीएससीने जाहीर केले. परंतु विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्ग वाढत असल्याने एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी योग्य नियोजन करत परीक्षा घ्याव्यात आणि आत्ता घोषित केलेल्या परीक्षांच्या तारखेबाबत पूनर्विचार करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीतमध्ये नेमके परीक्षा घेण्याबाबत निर्णय होतोय की, पुढे ढकलण्याबाबत हे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे.
दरम्यान या बैठकीत परीक्षा होणार आहेत की पुढे ढकलली जाणार आहे? परीक्षा होणार असतील तर काय खबदरदारी घ्यावी लागणार? तसेच परीक्षा पुढे ढकलली तर पुढचे वेळापत्रक नेमके कसे असेल? अशी प्रश्नांवर याबैठकीत आढावा घेतला जाणार आहे तसेच आढावा घेतला जाणार आहे.

यापू्र्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत 11 एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेसाठी लॉकडाऊनदरम्यान  वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी असे सरकारला आवाहन केले आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली जाऊ शकते असा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -