घरताज्या घडामोडीखुशखबर! औरंगाबाद येथे एमटीडीसीचे 'जपानी रेस्टॉरंट'

खुशखबर! औरंगाबाद येथे एमटीडीसीचे ‘जपानी रेस्टॉरंट’

Subscribe

औरंगाबाद येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) जपानी रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे.

औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ या ठिकाणी असलेला बौद्ध जपानी पर्यटकांचा ओघ पाहता या पर्यटकांच्या सोयीसाठी औरंगाबाद येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) जपानी रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एमटीडीसीच्या पर्यटक निवासातील उपहारगृहात भारतीय खाद्यपदार्थांबरोबर आता जपानी खाद्यपदार्थही उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे जपानी पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

जपानी खाद्यपदार्थांचा घेतला आस्वाद

जपानी खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणारे एमटीडीसी हे देशातील पहिले शासन अंगीकृत महामंडळ आहे. जपान येथील वाकायामा प्रांतातील शिष्टमंडळाच्या हस्ते रेस्टॉरंटचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. तर शिष्टमंडळाचे महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे एमटीडीसीचे मुख्य लेखाधिकारी दिनेश कांबळे यांनी स्वागत केले आहे. तसेच उद्घाटनानंतर शिष्टमंडळाने उपहारगृहातील जपानी खाद्यपदार्थं सुशी, टेंपुरा, रामेन नुडल्स, चिकन तुरीनोकरागे, मीसोसुप याबरोबरच भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

- Advertisement -

जपानी लोकांना भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडतात. त्यामध्ये इंडियन करी, चपाती, रोटी, चिकन तंदुरी आणि समोसा हे विशेष लोकप्रिय आहेत. आता याबरोबरच औरंगाबाद येथे जपानी खाद्यपदार्थही उपलब्ध झाल्याने जपानमधील पर्यटकांची मोठी सोय होईल. एमटीडीसीचे हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे.  – नाकाशीनी, वाकायामा प्रांतातील विधीमंडळ सदस्य

जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांमुळे जपानी पर्यटक औरंगाबाद येथे भेटीकरीता येत असतात. या जपानी उपहारगृहामुळे पर्यटकांना विशेष सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या वाढीस नक्कीच हातभार लागणार आहे.  – अभिमन्यू काळे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक


हेही वाचा – अरे बापरे! भारतात आढळला करोनाचा पहिला रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -