घरताज्या घडामोडीMumbai bank: ...म्हणून मजूर मतदारसंघातील जागेचा राजीनामा दिला, प्रवीण दरेकरांची सांगितलं 'कारण'

Mumbai bank: …म्हणून मजूर मतदारसंघातील जागेचा राजीनामा दिला, प्रवीण दरेकरांची सांगितलं ‘कारण’

Subscribe

महाराष्ट्रात असे उदाहरण क्वचित असेल की मी दोन मतदार संघातून निवडून आलो आहे. आणि सहकारी कायद्यानुसार दोन मतदारसंघातून निवडून आल्यावर एका मतदारसंघातून ३० दिवसांमध्ये राजीनामा द्यावा लागतो.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँक निवडणुकीमध्ये मजूर म्हणून संचालकपदाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये दरेकरांचा विजय झाला होता. परंतु त्यांनी मजूर म्हणून संचालकपदाची निवडणूक लढवल्यावर विरोधी पॅनलने आक्षेप घेतला होता. तसेच सहकार विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करत मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. परंतु दोन मतदारसंघातून निवडून आल्यामुळे मजूर म्हणून ज्या सहकारी संस्थेतून निवडून आलो त्या संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

मुंबई बँक निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर यांच्या सहकारी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. सर्व जागांवर दरेकरांनी विजय मिळवला आहे. दरम्यान मजूर म्हणून अर्ज केल्यामुळे दरेकरांवर टीकास्त्र डागण्यात येत होते. दरेकरांनी या संचालकपदाचा आता राजीनामा दिला आहे. दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना महिती दिली की, मी धोबीपछाड दिल्यानंतरही काहींच्या पोटात दुखत असेल तर त्याला माझा ईलाज नाही. कारण मुंबईतल्या जनतेनं आणि सहकारातील कार्यकर्त्यांनी 21 पैकी 21 जागा माझ्या नेतृत्वाखाली प्रचंड मतांनी निवडून दिल्या आहेत. त्यावेळीसुद्धा एनजीओ आणि काही पक्षांच्या लोकांनी पत्र पाठवले त्याला केराची टोपली मुंबईकरांनी दाखवली आहे.

- Advertisement -

त्याच्यामुळे आता वरातीमागून घोडे नाचवत आहेत. महाराष्ट्रात असे उदाहरण क्वचित असेल की मी दोन मतदार संघातून निवडून आलो आहे. सहकारी कायद्यानुसार दोन मतदारसंघातून निवडून आल्यावर एका मतदारसंघातून ३० दिवसांमध्ये राजीनामा द्यावा लागतो. कालच निकाल घोषित झाल्यावर मजूर सहाकारी संस्थेतून निवडून आलेल्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजीनामा मागण्याची तसदी यांना घेऊ देणार नाही असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

मजूराने श्रीमंत व्हावे असे कुठे लिहिले नाही

मला वाटत त्यांनी आता पत्र पाठवले आहे. ते पत्र जाणार डीडीआरकडे यानंतर डीडीआर संस्थेला विचारणार पण आम्ही हायकोर्टात जाणार असून तिथेच त्यांना उत्तर देऊ असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. देशातल्या मजूराने श्रीमंत व्हावे असे कुठे लिहिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला आपली आर्थिक उन्नती करण्याचा अधिकार दिला असल्याचे दरेकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai bank: मुंबई बँक संचालक प्रवीण दरेकर ‘कोट्याधीश’ मजूर म्हणून अपात्र, सहकार विभागाची कारवाई

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -