घरताज्या घडामोडीAnil Deshmukh : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून देशमुखांची कारागृहात चौकशी

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून देशमुखांची कारागृहात चौकशी

Subscribe

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पु्न्हा एकदा वाढ झाली आहे. अनिल देशमुखांचा सीबीआयकडून जबाब नोंदवला जाणार आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुली आरोप प्रकरणात सीबीआयने पुन्हा एकदा चौकशी केली. देशमुखांचा जबाब नोंदवण्यासाठी सीबीआय आर्थिक रोड कारागृहात दाखल झाली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अनिल देशमुखांची चौकशी करण्यात आली. उद्या म्हणजेच ५ मार्च रोजी देशमुखांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोप प्रकरणात ईडीने देखमुखांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. तर चांदीवाल आयोगासमोरील चौकशीदेखील अंतिम टप्प्यात आहे. विशेष पीएमएलए कोर्टाकडून ३ ते ६ तारखेपर्यंत चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आज देखील त्यांची चौकशी कारागृहात करण्यात आली. परंतु सीबीआयच्या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, याआधी कोर्टाने अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे तसेच निलंबित एपीआय सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यासाठी सीबीआयच्या टीमला परवानगी दिली होती. अँटेलिया स्फोटक प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाली होती.

सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जबाबासाठी न्यायालयात अर्ज केला होता. अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी पीएमएलए कोर्टाने सुनावली.

- Advertisement -

हेही वाचा : Russia Ukraine War : रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या इंधनाचे दर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -