घरताज्या घडामोडीअधिश बंगल्याबाबत नारायण राणेंना दिलासा नाहीच, न्यायालयाने याचिका फेटाळली

अधिश बंगल्याबाबत नारायण राणेंना दिलासा नाहीच, न्यायालयाने याचिका फेटाळली

Subscribe

याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला असून याप्रकरणी सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडे जाण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत.

अधिश बंगला (Adhish Bunglow) बेकायदा बांधकामप्रकरणी नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला असून याप्रकरणी सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडे जाण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत. (Mumbai High court rejected petition about adhish Bungalow by narayan rane)

अधिश बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनीही नोटीस पाठवली होती. सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याप्रकरणी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याप्रकरणी सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडे जा, त्यांना प्रकरण ऐकू द्या, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

- Advertisement -

नारायण राणे यांनी अधिश बंगला बांधताना सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एमसीझेडएमएकडे तक्रार आली होती. त्यानंतर, मुंबई उपनगर जिल्हा किनारा क्षेत्र व्यवस्थापन कमिटीने यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अहवालाच्या आधारे राणे यांना नोटीस बजावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -