घरताज्या घडामोडीआशिष शेलार ज्ञानी सज्ञानी आहेत असं बेताल वक्तव्य त्यांनी करु नये, महापौरांचा...

आशिष शेलार ज्ञानी सज्ञानी आहेत असं बेताल वक्तव्य त्यांनी करु नये, महापौरांचा पलटवार

Subscribe

विरोधी पक्ष असल्यामुळे आरोप करणे हा त्यांचा उद्योग आहे. तो उद्योग चांगला करत असून आम्हाला त्यांचे आरोप खोडण्यात वेळ घालवायचा नाही

कोरोना महामारित नागरिकांना वाचवले कोणी आणि मुंबईकरांना संकटात घालतंय कोण हे सगळ्यांना माहिती आहे. शिवसेनेला कधीच निवडणूकांची भीती नाही. आम्ही काम करत असतो त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरातलेच आम्ही वाटतो हिच विरोधकांची पोटदुखी आहे. या पोटदुखीवर आमच्याकडे औषध नाही तर येणारी निवडणूकच त्यांना औषध असेल असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. तर भाजप नेते आशिष शेलार ज्ञानी, सज्ञानी आहेत सगळं त्यांच्याकडेच आहे असे बेताल वक्तव्य करु नये असा पलटवार किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

मुंबई महागरपालिकेची निवडणूक पहिल्या कोरोनाच्या लाटेनंतर राज्य सरकारला घ्यायची होती ती फसली, प्रभाग रचना बदलायची होती तो प्लान शिवसेनेचा फसला असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता यावर मुंबईच्या महापौर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताला प्रत्युत्तर दिले आहे. मुळात असे प्लान काही फसत नसतात, हे सगळं त्यांनी रचले आहे. लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांचा चकवा द्यायचा, आभास निर्माण करायचा आणि चर्चेत राहायचे या सगळ्या गोष्टींना आता मुंबईकर भूलणार नाही आहेत. कारण जीवन मरणाचा प्रयत्न असताना कोणी वाचवले हे मुंबईकरांना चांगले माहिती झालं आहे तसेच जीवन मरणाच्या खाईत लोटणारं कोण होते हे लोकांना कळलं असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

विरोधी पक्ष असल्यामुळे आरोप करणे हा त्यांचा उद्योग आहे. तो उद्योग चांगला करत असून आम्हाला त्यांचे आरोप खोडण्यात वेळ घालवायचा नाही आहे. लोकांसोबत त्यांच्या प्रश्नांसोबत त्यांना जे काही चांगले आहे ते द्यायचे आहे. असे प्रत्युत्तर ३० प्रभागांच्या रचनेच्या आरोपावर पेडणेकरांनी दिले आहे. आशिष शेलार यांनी ज्ञानी आणि सज्ञानी असे सगळेच त्यांच्याकडे असल्यासारखे बेताल वक्तव्य करु नये असा पलटवार मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या कामात अडथळा

पर्यावण मंत्री आदित्य ठाकरे हे वरळीतच विकास करतात असा आरोप करण्यात येत आहे. यावर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ आहे. त्यामुळे ते तिथे काम करणार परंतु पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. याचा परिणामही चांगला दिसून येत आहे. कोरोना नसता तर त्यांच्या कामांची मोठी चर्चा असती. आदित्य ठाकरेंच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -