घरताज्या घडामोडीराणा दाम्पत्य खारमधील निवासस्थानी, पोलिसांनी बजावली सीआरपीसी १४९ची नोटीस

राणा दाम्पत्य खारमधील निवासस्थानी, पोलिसांनी बजावली सीआरपीसी १४९ची नोटीस

Subscribe

राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरून जोरदार राजकारण सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानुसार ते मुंबईत दाखल झाले. मात्र, शिवसैनिकांच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून राणा दाम्पत्यांबाबत संतापाच्या प्रतिक्रिया येत आहेत. राण दाम्पत्य हे मुंबईत आल्यानंतर नेमके कुठे गेले?, याची जोरदार चर्चा राज्यात रंगत होती. मात्र, राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार इथल्या आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच त्यांना सीआरपीसी १४९ची नोटीस पोलिसांनी बजावली आहे.

- Advertisement -

राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार इथल्या निवासस्थानी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलंही काम करु नका, असं आवाहनही पोलिसांनी राणा दाम्पत्याला केलं आहे. या नोटीशीनुसार कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राणा दांपत्याची असणार आहे.

नवनीत राणांना वाय दर्जाची सुरक्षा

राणांच्या घराबाहेर आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून नवनीत राणांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेनुसार ४ ते ८ सुरक्षा जवान त्यांच्या सुरक्षततेसाठी तैनात असतात. या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एक किंवा दोन कमांडोही असतात. तसेच सीआरपीएफचे जवान सुद्धा यामध्ये तैनात असतात.

- Advertisement -

मातोश्रीवर येणं राणांनी स्वप्नात सुद्धा बघू नये – खासदार अनिल देसाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रत्येक प्रश्नावर मात केली आहे. हे महाविकास आघाडीचं सरकार कशाप्रकारचे अस्थिर करायचं. हे हनुमान चालिसा म्हणतायत परंतु त्यांना तरी म्हणता येते का, पहिल्यांदा पाठांतर तरी करा किंवा त्यांचा अर्थ तरी समजून घ्या. मातोश्रीवर येणं राणांनी स्वप्नात सुद्धा बघू नये, असं खासदार अनिल देसाई म्हणाले.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -