घरमहाराष्ट्रमंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

पोलीस स्थानकात पत्तीच्या विरोधात तक्रार करुन देखील पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर या महिलेने मंत्रालयात धाव घेत दाद मागितली. मात्र या महिलेला मंत्रालयात देखील जाऊ न दिल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.

पत्तीविरोधात तक्रार दाखल करुन देखील पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या महिलेने मंत्रालयासमोर जाऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसात पत्तीविरोधात तक्रार दाखल करुन देखील पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. अखेर या महिलेने मंत्रालयात धाव घेत गृह विभागात दाद मागण्यासाठी गेली होती. मात्र या महिलेला मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. या ठिकाणी देखील आपल्याला न्याय मिळत नसल्याचे लक्षात येताच या महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दिपाली भोसले असे या महिलेचे नाव असून मरिन लाईन्स पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.

का केला आत्महत्येचा प्रयत्न

चेंबूर येथे राहणारी महिला आरसीएफ पोलीस ठाणे आपल्या नवऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. या महिलेची पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली मात्र याबाबत योग्य ती कारवाई केली नाही. अखेर या महिलेने मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र मंत्रालयात देखील या महिलेला आत जाण्यास नकार दिल्याने या संतप्त झालेल्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

काय होती या महिलेची तक्रार

लग्न होऊन देखील मागील सात वर्षांपासून आपला नवरा आपल्या सोबत न राहता अन्य एका महिलेसोबत राहत आहे. आपला पती आपली देखभाल करत नसल्याचा आरोप या महिनेने तक्रारी केला आहे.

नवऱ्याला एक महिन्याची अटक

या आधी देखील सदर महिलेने पतीच्या विरोधात तक्रार केली होती. तिच्या तक्रारीची दखल घेत चेंबूर आरसीएफ पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. यानंतर आज पुन्हा एकदा ही महिला मंत्रालयासमोर आल्यानंतर चक्कर येऊन पडली. या महिलेला उपचाराकरता जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेने रॉकेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.  – विलास गंगावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मरिन लाईन्स पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -