घरमहाराष्ट्रलॉकडाऊनमध्ये 'चेन्नई एक्स्प्रेस'ची चर्चा; किंगखानचा प्रसिद्ध डायलॉग होतोय व्हायरल

लॉकडाऊनमध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची चर्चा; किंगखानचा प्रसिद्ध डायलॉग होतोय व्हायरल

Subscribe

'Don't underestimate the power of Social Distancing!' पोलिसांनी शाहरुखच्या डायलॉगचा वापर करत नागपूरकरांना दिला सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला ...

देशभरासह राज्यात दहशत पसरवणाऱ्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान प्रत्येक नागरिकांने विनाकारण घराबाहेर न पडता आपल्या घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी वर्ग देखील कुठे मागे राहिला नाही. सोशल मीडियाच्या मदतीने हे पोलीस कर्मचारी आपल्या गाण्यातून तसेच संदेश देणाऱ्या पाट्यांच्या माध्यमातून घरीच सुरक्षित राहून सोशल डिस्टन्सिंचे महत्त्व पटवून देत आहेत.

नागपूर पोलिसांचा अनोख्या स्टाईलने सोशल डिस्टन्सिंचा सल्ला

पुण्यापाठोपाठ नागपूर पोलीसदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनोख्या हटक्या स्टाईलचा अवलंब करताना दिसले आहे. यामध्ये नागपूर पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंचा सल्ला नागरिकांना देताना एक ट्विट केले आहे. हे ट्विट करताना त्यांनी दीपिका पदुकोण आणि शाहरूख खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटातील फोटोच शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना या पोलिसांनी या फोटोला कॅप्शन देताना सुद्धा चित्रपटातील डायलॉगचाच वापर केला आहे.

- Advertisement -

या ट्विटमध्ये नागपूर पोलिसांनी असे लिहिले आहे की- ‘Don’t underestimate the power of Social Distancing!’ पोलिसांनी शाहरुखच्या डायलॉगचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला नागपूरकरांना दिला आहे.


VIDEO: कोरोनाविरुद्ध पुणे पोलिसांनीही कसली कंबर; रक्षणकर्त्यांची आर्त हाक नक्की ऐका!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -