घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024 : अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; पहिल्याच सभेत अजित पवारांना...

Lok Sabha 2024 : अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; पहिल्याच सभेत अजित पवारांना म्हटले दुर्योधन 

Subscribe

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघामधील लढत रंगतदार होताना दिसत आहे. लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (शुक्रवार) शेवटचा दिवस असताना साताऱ्यात बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अभिजीत बिचकुले यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिजीत बिचुकले यांनी पत्नी अनुअंकृत बिचुकले यांच्यासह दोन अनुमोदक आणि सूचक यांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत फक्त चार लोक होते. अर्जदाखल केल्यानंतर त्यांनी अजित पवारांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना दुर्योधन म्हटले.

उमेदवारी अर्ज भरताना कोणतेही शक्तीप्रदर्शन केले गेल नाही. मात्र बिचकुले यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.
त्यांच्या उपस्थितीमुळे साताऱ्यातील दिग्गज नेत्यांना आव्हान मिळाले आहे का, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

- Advertisement -

अभिजीत बिचकुले हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमाणेच शीघ्र कवी आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी सडेतोड भाषण करत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच खुले आव्हान दिले. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. अजित पवार जर महिलांना द्रौपदी म्हणत असतील तर त्यांच्या डोक्यात दुर्योधन लपला आहे त्यामुळे त्या दुर्योधनाचा अंत करण्यासाठी मी कृष्ण म्हणून समोर असून त्या दुर्योधनाला संपवणार असे म्हणत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याप्रमाणे कॉलर उडवली.

अभिजीत बिचकुलेंचा अजित पवारांवर निशाणा 

- Advertisement -

अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात नसताना अजित पवारांवर हल्लाबोल करण्याचे का प्रयोजन असा प्रश्न उपस्थितांना पडला. बिचकुले हे त्यांच्या वक्तव्यामुळेच राज्यात चर्चेत असतात, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिजीत बिचुकले अजून किती स्फोटक विधाने करणार याकडे सर्व सातारकरांचे लक्ष लागले आहे.

सातऱ्यात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचा सांगलीचा तिढा मिटणार; राऊत म्हणाले, विशाल पाटील आमचे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -