घरताज्या घडामोडीविधानसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये अडथळे आणणाऱ्यांना कोर्टाची चपराक, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये अडथळे आणणाऱ्यांना कोर्टाची चपराक, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणून ही निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करत असलेल्या भारतीय जनता पक्ष व माजी मंत्री गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून आज मोठी चपराक दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आतातरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व १२ आमदारांच्या विषयावर लवकर निर्णय घ्यावा अशी आमची विनंती असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधिमंडळ आवारात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे काम करत आहे. कुठलातरी कायदा पुढे करुन न्यायालयात याचिका दाखल करायची परंतु त्यांच्या या प्रवृत्तीला उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांची याचिका फेटाळत १२ लाख रुपयेही जप्त करुन मोठी चपराक दिली आहे. भाजपने आतातरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचे आणि चांगले काम सुरू आहे त्याला कोर्टात आव्हान द्यायचे काम भाजपने बंद करावे. राज्यपाल महोदय यांना माझी विनंती आहे की त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प ११ तारखेला सादर केला जाणार आहे. त्याआधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी अशी आमची इच्छा आहे. अशोक चव्हाण, अनिल परब, अजित पवार यांनी राज्यपाल यांची मंगळवारी भेटही घेतली आहे. अर्थसंकल्पाच्या आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी आणि राज्यपाल त्यादृष्टीने निर्णय घेतील असा आमचा विश्वास आहे, असे नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : BJP Morcha : दाऊद कनेक्शन असणाऱ्या मलिकांना मुख्यमंत्री ठाकरे वाचवताहेत, कुठे गेला ठाकरी बाणा?, दरेकरांचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -