घरताज्या घडामोडीसंजय राऊत यांना घाम फुटण्याचं कारण काय?; नारायण राणेंचा सवाल

संजय राऊत यांना घाम फुटण्याचं कारण काय?; नारायण राणेंचा सवाल

Subscribe

जो घाम फुटला होता तो विरोधकांनी फोडला का चुकीच्या कामामुळे कृत्यामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता हे सांगण्यासाठी मुद्दाम पत्रकार परिषद घेतली असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे घेतली होती. परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांना घाम फोडायचे सोडून स्वतःच घाम पुसताना दिसले आहेत. राऊतांनी शिवसेना भवनात प्रवेश केल्यापासून सारखे घाम पुसताना दिसले. यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. संजय राऊतांना घाम फुटण्याचे कारण भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे. तसेच राऊतांच्या आरोपांवर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा लागण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची थयथयाट होत असल्याचे यावेळी नारायण राणे म्हणाले आहेत.

राज्यसभा खासदार संजय राऊत यांची जी केविलवाणी परिस्थिती झाली होती आणि जो घाम फुटला होता तो विरोधकांनी फोडला का चुकीच्या कामामुळे कृत्यामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता हे सांगण्यासाठी मुद्दाम पत्रकार परिषद घेतली असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

विकासाच्या प्रश्नावर काहीही उत्तर नाही. उद्योग मंत्री पत्राचाळीतून बंगल्यात गेले. मोहित कंबोज यांनी सांगितले २५ हजारांचा चेक संजय राऊतांना दिला. इकडे पैसे कमवायचे आणि सांगायचे मी संपादक पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना..मग शिवसेनेची गोडवी गणार.. उद्धवजींना माहिती नाही सुरुंग लावतोय.. त्यांना माहिती आहे आज ना उद्या जागा खाली राहणार आता शिवसेनेत कोण नाही तर मी आहे. बाळासाहेबांवर, मुख्यमंत्र्यांवर टीका केली पद मिळाले आता थेट मुख्यमंत्री होणार. परंतु एक आरोप झाला तर घाम फुटला आहे. अजून बरंच काही निघायचे आहे. ईडीशी बोलू नको तुला बिडी प्यायला लावतील. उगाच आपली कुवत किती असे खडेबोल संजय राऊतांना नारायण राणेंनी सुनावले आहेत.

संजय राऊतांनी यापूर्वी दिल्लीला मनोहर जोशी यांनी कमिटमेंट दिली की आता खासदारकी आली की तुम्हाला देणार परंतु त्यांना न देता कोणाला दिली तर प्रितीश नंदीला, त्यांनी त्यावेळी काय म्हटलं ते आता पूर्ण सांगू शकत नाही परंतु एकच वाक्य सांगतो ‘साहेबांचे आणि उद्धवचे मी कपडे उतरवीन’ मला पद दिले नाही तर यांना रस्त्यावर आणेल. असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे कोणत्याही क्षणाला मी पत्रकारांसमोर पुरावा आणेल की ते कोणासमोर बोलले, यांची लायकी काय आहे साहेबांविषयी बोलण्याची, तु्म्ही जेव्हा लिहित होता तेव्हा साहेबांनी चिडून काही कार्यकर्त्यांना जे बोलले ते जर मला बोलले असते तर तुम्ही आज नसता. बाळासाहेबांबाबत कोणी बोलले ते आय़ुष्यात कधी ऐकून घेतलं नाही आहे. एवढ्या घाणेरडे बोलले आहेत. आता फक्त पदाला आणि पैसे कमवायला आले आहेत. कुठे होता आणि कसा होता, कसा झोळी घेऊन फिरायचा हे मी पाहिले असल्याचे नारायण राणे म्हणाले आहेत. दुसऱ्यांवर आरोप करण्याचे तुमचे काम नाही. पगारी नेते आहात. सामनात ओव्हरटाईम करुन पगार घेता असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : प्रवीण राऊतांनी ईडीच्या चौकशीत नावं घेतल्याने संजय राऊतांचा थयथयाट, नारायण राणेंचा हल्लाबोल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -