घरक्रीडाICC T20 Rankings: राहुल-विराटचा टॉप १० मध्ये समावेश, भारत दुसऱ्या स्थानावर

ICC T20 Rankings: राहुल-विराटचा टॉप १० मध्ये समावेश, भारत दुसऱ्या स्थानावर

Subscribe

साधारण कामगिरी असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच एक स्थान घसरला असून सातव्या स्थानि स्थिरावला आहे. तर डेवोन कॉन्वे आठव्या स्थानी आला आहे.

आयसीसी कडून टी-20 श्रेणी जाहीर केली आहे. फलंदाजांमध्ये भारताचा लोकेश राहुल आणि विराट कोहलीने पहिल्या 10 मध्ये स्थान निश्चित केलं आहे. यामध्ये विराट कोहली दहाव्या तर राहुल चौथ्या स्थानावर आहे. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त भारताच्या कोणत्याही खेळाडूला पहिल्या 10 मध्ये जागा मिळवता आली नाही. भुवनेश्वर कुमार 21 व्या स्थानी असून तो भारताचा स्टार खेळाडू आहे. संघांच्या श्रेणीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजच्या संघाला 3-0 अशा फरकाने पराभूत झाल्यास भारतीय संघ पहिल्या स्थानी येऊ शकतो.

T20 सर्वात मोठा बदल जोश हेजलवुडच्या क्रमवारीत झाला आहे. त्याने चार स्थानांनी झेप घेतली असून गोलंदाजांच्या क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्याशिवाय यूएईच्या रोहन मुस्तफाला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो अष्टपैलू क्रमवारीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisement -

फलंदाजांच्या यादीमध्ये पहिले स्थान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने पटकावलं आहे. त्याच्याकडे एकूण 805 रेटिंग पॉइंट आहेत. तर पाकिस्तानचा सलामीवीर जोडीदार रिजवान दुसऱ्या स्थानी आहे. आफ्रिकेचा एडेन मार्करम तिसऱ्या, भारताचा लोकेश राहुल चौथ्या आणि इंग्लंडचा डेविड मलान पाचव्या स्थानी आहे. यंदाच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत एकच बदल झाला आहे. साधारण कामगिरी असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच एक स्थान घसरला असून सातव्या स्थानि स्थिरावला आहे. तर डेवोन कॉन्वे आठव्या स्थानी आला आहे.

गोलंदाजांमध्ये वानिंदू हसरंगा तिसऱ्या स्थानी

गोलंदाजांच्या आकडेवारीतल मोठे बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी पुन्हा एकदा पहिल्या स्थानी आला आहे. तर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या जोश हेझलवूडला चार स्थानांचा फायदा झाला असून, तो दुसऱ्या स्थानावर गेला आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. याशिवाय टी-20 क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.

- Advertisement -

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत एक बदल झाला आहे. यूएईच्या रोहन मुश्तफाने पाच स्थानांनी झेप घेतली असून तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी पहिल्या तर बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. नामिबियाचा जेजे स्मित आठव्या तर ओमानचा झीशान मसूदही दहाव्या स्थानावर राहिला. श्रीलंकेचा हसरंगाही अष्टपैलूंच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम आहे.


हेही वाचा : IPL Mega Auction 2022 : आयपीएलमध्ये १०.७५ कोटींचा पाऊस पडल्यानंतर निकोलस पूरनने दिली पिझ्झा पार्टी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -