घरमहाराष्ट्रRaj Thackeray : गद्दारी ती गद्दारीच ! नारायण राणेंची राज ठाकरेंच्या भाषणावर...

Raj Thackeray : गद्दारी ती गद्दारीच ! नारायण राणेंची राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया

Subscribe

राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांना संबोधून केलेल्या भाषणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये दिवसभरात भाजपच्या अनेक नेत्यांनीही राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या बाण्याचे तोंडभरून कौतुक केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’ अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

- Advertisement -

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयुत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा समाचार घेतला आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून ते ठाकरे घराण्याच्या मुंबई महापालिकेच्या कारभारातील ढवळाढवळ अशा अनेक मुद्द्यांच्या निमित्ताने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुढी पाडवा मेळाव्यात टीका केली होती.

हिंदुत्वाशी गद्दारी

ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी मविआ सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर टीका केली. राज ठाकरे यांनीही भाजप आणि शिवसेना म्हणून मतदारांनी मतदान केल्याचा मुद्दा मांडला होता. त्यामध्ये शिवसेना सत्तेत किंगमेकर ठरणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची टूम सोडली. मुख्यमंत्री पद हे तर महाराष्ट्राचे असते, मग बंद दाराआड झालेली मुख्यमंत्री पदाची चर्चा ही महाराष्ट्राला का सांगितली नाही ? असाही सवाल राज ठाकरे यांनी केला होता.

दरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये आमदार नितेश राणे यांनीही एक अतिशय मार्मिक अशी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनीही हिंदुंत्वाचा दाखला देत दोन ओळी ट्विट केल्या आहेत. जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -