घरताज्या घडामोडीनितेश राणेंना निवडणुकीपर्यंत डांबून ठेवण्याचा राज्य सरकारचा डाव, नारायण राणेंचा आरोप

नितेश राणेंना निवडणुकीपर्यंत डांबून ठेवण्याचा राज्य सरकारचा डाव, नारायण राणेंचा आरोप

Subscribe

विधिमंडळाच्या पायरीवर नितेश राणे यांनी काढलेल्या आवाजाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समर्थन करत पाठराखण केली आहे. तसेच कणकवली प्रकरणात फिर्यादीला साधे खरचटले असताना ३०७ कलम लावून नितेश राणेंना निवडणुकीपर्यंत डांबून ठेवण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

विधिमंडळाच्या पायरीवरील आवाजाचे केले समर्थन

विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलनावेळी मांजरीचा आवाज काढल्‍याच्या मुद्दयावरून आमदार नीतेश राणे यांच्यावर सत्ताधारी पक्षाचे नेते आरोप करत आहेत. पण मांजरीचा आवाज काढण्यात एवढे आक्षेपार्ह काय आहे. पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांचा आवाज तर मांजरीचा नाही. तसंच आदित्‍य ठाकरे आणि मांजराचा काय संबंध आहे का असा प्रश्‍न श्री.राणे यांनी आज केला. सत्तेचा दुरुपयोग म्हणजेच प्रशासनाचा दुरुपयोग आहे. एका आमदारासाठी राज्यभरचे पोलीस इथे आलेत. इथे कोणी दहशतवादी आलेत का? ‘तो’ हल्ला करणाऱ्यांमध्ये नितेश राणे होते का? कुठूनही नाव गोवायचं आणि निवडणुकीपर्यंत त्यांना कलम ३०७ लावून बंद करून ठेवायचा डाव विरोधकांनी आखलेला डाव आहे. छातीवर उजव्या बाजूला खरचटल्यावर ३०७ लागतो, हे पहिल्यांदाच घडतंय. पोलिसांची वागणूक चुकीची आहे असेही ते म्हणाले.

- Advertisement -

साधं खरचटल्याची घटना घडली असताना एवढे वातावरण का

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक येतात. राज्यभरातील पोलीस इथे तैनात केले जातात. इथे एवढं असं काय घडलंय की प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला जातोय? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज उपस्थित केला. तसेच एखाद्या व्यक्तीला साधं खरचटलं असेल तर ३०७ सारखं कलम लावलं जातं असेल तसेच आमदार नितेश राणे यांचा मारहाणीत सहभाग नसताना त्यांना आरोपी केलं जातं ही बाब चुकीची आहे. सिधुदुर्गात असं काय घडलं आहे की राज्यातील पत्रकार, राज्याचे पोलिस संचालक, अतिरिक्त संचालक इथे येत आहेत. तसंच राज्यभरातील पोलीस यंत्रणा सिंधुदुर्गात का आणण्यात आली आहे.

साधं खचटल्यासारखी घटना असताना एवढी वातावरण निर्मिती का केली जातेय. हा सगळा सत्तेचा दुरूपयोग आहे. कणकवलीत मारहाणीची घटना झाली. त्यात नीतेश राणेंचा सहभाग नव्हता. मात्र जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना डांबून ठेवण्यासाठी ३०७ कमलाचा वापर होतोय असेही राणे म्हणाले.

- Advertisement -

नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का

यावेळी पत्रकारांनी त्यांना आमदार नितेश राणे आता कुठे आहेत ? असा प्रश्न विचारला असता ते कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का ? असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी दिले. कोकणात वादळ, पूर येऊन गेले. तेव्हा अजित पवार आले नाहीत. मात्र यावेळी आले. परंतु जाहीर केलेले पैसे पोहोचलेत का, याची निदान माहिती करून त्यांनी यायला हवं होतं. लघुपाटबंधारेसाठी १३ कोटीची प्रोविजन असताना साडेसहा कोटी पाठवले. पण एकही टेंडर गेले नाही. या सरकारबद्दल जनतेला आस्था नाही. एका पदासाठी भांडणारे जनतेला काय न्याय देणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.


हेही वाचा : Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, जाणून घ्या आजचे नवीन दर?


 

नितेश राणेंना निवडणुकीपर्यंत डांबून ठेवण्याचा राज्य सरकारचा डाव, नारायण राणेंचा आरोप
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -