घरताज्या घडामोडीMaharashtra Politics: राज्यात मार्चपर्यंत भाजपाचं सरकार येणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भविष्यवाणी

Maharashtra Politics: राज्यात मार्चपर्यंत भाजपाचं सरकार येणार, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भविष्यवाणी

Subscribe

महाराष्ट्रातील सरकार नक्की पडेल...

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी वर्षात राज्यातील निवडणुका होणार आहेत. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात मार्च अखेर पर्यंत भाजपाचं सरकार बनू शकतं. अशा प्रकारचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. आता जे काही चाललंय ते सर्व सुरळीत होईल. असं वक्तव्य राणे यांनी जयपूरमध्ये केलं आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आपले सर्व प्रकारच्या कार्यक्रम सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मुंबईतून दिल्लीला रवाना झाले आहेत.

महाराष्ट्रातील सरकार नक्की पडेल, असं विधान राणे यांनी केलं आहे. यापूर्वीही काही जण पुन्हा येणार असं म्हणत आलेत. परंतु असं विधान करताना केंद्रीय मंत्र्यांना भान असणं महत्त्वाचं आहे. अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यातील भाजपचं विमान कालपासून दिल्लीला उडत आहे. कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. परंतु चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज सकाळी दिल्लीत झेप घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना बैठकीमध्ये सहभागी होणे आवश्यक होते.मात्र, ते उशीरा दिल्लीला पोहोचले. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस भाजपाच्या मुख्यालयात मंत्री बीएल संतोष यांची भेट घेणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांची भेट शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळीक नेत्याशी झाल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सातत्याने अस्थिर करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला आहे. परंतु हे सरकार काहीही झालं तरी ५ वर्षे पूर्ण कार्यकाळ करेल. अशी ग्वाही शरद पवार यांनी दिलीयं.

- Advertisement -

तृणमृल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनीही काल दोन दिवसांपूर्वी पीएम मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. तसेच त्यांनी त्रिपूरा दंगल व इतर महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठीच शरद पवार दिल्लीला रवाना झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपाचे नेते दिल्लीत सरसारवल्याची चर्चा होत आहे.


हेही वाचा: South Africa Corona Variant: कोरोनाचा नवा व्हेरियंट B.1.1.529 एड्स रुग्णापासून म्युटेट झाला?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -