घरताज्या घडामोडीनाशिक भीषण अपघात; मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

नाशिक भीषण अपघात; मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

Subscribe

नाशिकच्या बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातमध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मालेगाव-देवळा रस्त्यावरील मेशी फाटा येथे धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ हा अपघात झाला. मंगळवारी (दि.२८) दुपारी एसटी बस आणि रिक्षा भीषण अपघात झाला. कठडा तोडून रिक्षा आणि बस विहिरीत कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी जखमी झाले आहे. या घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. महामंडळतर्फे या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत करणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केलं आहे.

नक्की काय घडलं?

मेशी फाट्याजवळ मालेगावहून कळवणकडे जाणाऱ्या बसचे टायर फुटले. त्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटून पुढे असलेल्या अॅपे रिक्षावरती बस आदळली. अपघातनंतर दोन्ही वाहने फरफटत जाऊन विहिरीत कोसळली. आधी रिक्षा त्यानंतर बस कोसळली. रात्री उशिरापर्यंत अपघातस्थळी मृतांचा शोध आणि मदतकार्य सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह आमदार डॉ. राहुल आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केलं.

- Advertisement -

नाशिक जवळ झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी असून या अपघाताची माहिती महामंडळ स्थरावर घेण्यात येत आहे. जे प्रवासी आणि कर्मचारी या अपघातात मृत झाले आहेत, त्यांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी जखमी आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार आहेअॅड. अनिल परब, परिवहनमंत्री

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर नाशिक जिल्ह्यतील देवळा-मालेगाव मार्गावर दहीवड येथे झालेल्या भीषण अपघाताच्या घटनास्थळी आज सकाळी १०.३० वाजता भेट देणार आहेत. तसेच या दुर्देवी अपघातातील जखमी व्यक्तीची देवळा ग्रामीण रुग्णालय, उमराणे ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय चांदवड ग्रामीण रुग्णालय आणि मालेगाव ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन विचारपूस करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्र सरकारच्या झोकांड्या जात आहेत – शिवसेना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -