घरमहाराष्ट्रनाशिकगौळाणे येथील बहुचर्चित खतप्रकल्पाला भीषण आग

गौळाणे येथील बहुचर्चित खतप्रकल्पाला भीषण आग

Subscribe

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

नाशिक : गौळाणे येथील नाशिक महानगरपालिकेच्या कचरा डेपो अर्थात खत प्रकल्पाला बुधवारी
(दि. १३) भीषण आग लागली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळू शकलेले नव्हते. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट गोळाणेसह परिसरात दिसत होते.

आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले. आगीचे स्वरुप पाहता हे प्रयत्न अत्यंत तोटके होते. देनंदिन संकलित होणारा शहरातील कचरा गौळाणे येथील कचरा डेपोमध्ये संकलित केला जातो. लाखो टन कचरा एकत्रित जमा झाल्याने प्रकल्पात कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. या कचऱ्याला बुधवारी दुपारी २ वाजेदरम्यान भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केलेले असून, धुराचे असंख्य लोट आकाशात झेपावत आहेत. यामुळे हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याने गौळाने, पाथर्डी, विल्होळी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -