घरताज्या घडामोडीबी.एड प्रवेश परीक्षेसाठी 20 मेपर्यंत अर्ज

बी.एड प्रवेश परीक्षेसाठी 20 मेपर्यंत अर्ज

Subscribe

ऑनलाईन सुविधा : राज्यातील 90 महाविद्यालयांत 44 हजार जागा

नाशिक : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बी. एड. या दोन वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज 20 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे 90 बी. एड. महाविद्यालयांत 44 हजार जागा उपलब्ध आहेत. गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. पात्रता असूनही नोकरीची संधी मिळत नसल्यामुळे बी. एड.च्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येते. मात्र, केंद्र सरकारने शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करत बी. एड. हा अभ्यासक्रम आता पदवी शिक्षणासोबत तीन वर्षांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने सध्या पदवी शिक्षणानंतर दोन वर्षांत बी. एड. या व्यावसायिक पदवीव्युत्तर पदवीचे शिक्षण घ्यावे लागते. करोनाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक विद्यार्थ्यांकडून 20 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

ऑनलाईन फॉर्म कोणाला भरता येतो?
– कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
-पदवी,पदव्युत्तर पदवी स्तरावर (खुला संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 50% गुण तर राखीव संवर्गासाठी किमान 45% गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी
-कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी शेवटच्या सेमीस्टरची परीक्षा देणारा अ‍ॅपियर विद्यार्थी.
&..
फॉर्म भरण्यासाठी लागणारी मुळ कागदपत्रे
– दहावी, बारावी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
-पदवी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष गुणपत्रक
-रहिवासी प्रमाणपत्र
-राखीव संवर्गासाठी जात प्रमाणपत्र
-आधार कार्ड
-पासपोर्ट साईज फोटो
– डिजिटल स्वाक्षरी
-परीक्षा केंद्रांसाठी 1,2,3 पर्याय द्यावयाचे आहेत.
-मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र
-जात वैधता प्रमाणपत्र

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट
www.mahacet.org
www.dhepune.gov.in
www.bed.mhpravesh.in

प्रतिक्रिया
बी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याशिवाय प्रवेश होत नसल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रवेश परीक्षा द्यावी. प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे महाविद्यालयात मोफत सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर ते सुरु करण्यात येईल.
-प्राचार्य डॉ.चंद्रकांत बोरसे, (अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे बी. एड. महाविद्यालय)

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -