Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक अबब! दीड वर्षात तब्बल २१ लाख कोरोना टेस्ट

अबब! दीड वर्षात तब्बल २१ लाख कोरोना टेस्ट

१६ लाख ९६ हजार ७२६ रिपोर्ट निगेटिव्ह, ३ लाख ९६ हजार ५६३ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ओसरला तरी संशयित रुग्ण कोरोना टेस्ट करून घेत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मार्च २०२० ते १३ जुलै २०२१ या कालावधीत तब्बल २० लाख ९४ हजार २१९ संशयित कोरोना रुग्णांनी कोरोना टेस्ट केली. यामध्ये १६ लाख ९६ हजार ७२६ संशयित रुग्णांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले. तर ३ लाख ९६ हजार ५६३ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात ८ हजार ४४१ रुग्णांचा बळी गेला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होती. तर दुसरी लाट १६ फेब्रुवारी ते ३० जून २०२१ या कालावधीत होती. या दोन्ही कोरोनाच्या लाटेमध्ये एकूण ३ लाख ९६ हजार ५६३ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ३ लाख ८६ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ८ हजार ४४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १ हजार ६१२ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहर ६४२, नाशिक ग्रामीण ९२०, मालेगाव ४९ आणि जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा सर्वाधिक प्रभावी असल्याचे आकडेवारी समोर आले आहे. पहिल्या लाटेत ११ लाख ८ हजार ३५३ रुग्ण बाधित आले तर दुसर्‍या लाटेत तब्बल २७ लाख ६ हजार २६२ रुग्ण बाधित आढळून आले. विशेष म्हणजे, पहिल्या लाटेत २ हजार ४६२ रुग्णांचा बळी गेला तर दुसर्‍या लाटेत ५ हजार ८९२ रुग्णांचा बळी गेल्याची नोंद आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे तिसरी लाटेसुद्धा प्रभावीच असण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्यासह कोरोना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात वाढली डोकेदुखी

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरला असला, तरी अजून कोरोना संपलेला नाही. विशेष म्हणजे, नाशिक शहरात ६८५ तर ग्रामीणमध्ये सर्वाधिक ९१४ रुग्ण आहेत. यामध्ये सिन्नर, चांदवड, निफाडमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

२४ तासांत अवघे १५३ नवे कोरोनाबाधित

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. बुधवारी (दि.१३) दिवसभरात अवघे १३४ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर 75, नाशिक ग्रामीण 70, मालेगाव ४ आणि जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहरातील दोन व नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

- Advertisement -