घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअडीच महिन्यांत १२ खून, १९ प्राणघातक हल्ले; नाशिकची क्राईम कॅपिटलकडे वाटचाल?

अडीच महिन्यांत १२ खून, १९ प्राणघातक हल्ले; नाशिकची क्राईम कॅपिटलकडे वाटचाल?

Subscribe

नाशिक : शहरात खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, अडीच महिन्यांत १२ खून व १९ प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. २० दिवसांमध्ये ८ घटना घडल्या आहेत. त्यातील दोन सातपूर व फुलेनगरमध्ये गोळीबार करण्यात आल्याच्या घटना आहेत. या घटनांमुळे नाशिककरांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

शहरात किरकोळ कारणावरून धारदार हत्यारे व कोयत्याचा वापर मारहाणीचा होत आहे. यासंदर्भात सातत्याने गुन्हे दाखल होत असताना, पोलिसांकडून मात्र टवाळखोरांविरुद्ध कारवाईसाठी उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे टवाळखोरांमध्येच गँगवार होऊन भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांकडून गस्ती पथके नेमलेली असतानाही टवाळखोर हत्यारे बाळगत वावरत असल्याचे दहशतीचे वातावरण आहे.

- Advertisement -
हल्ल्यांच्या घटनांनी बिघडतेय शहरातील सामाजिक स्वास्थ्य

नाशिकमध्ये प्राणघातक हल्ले, मारहाण, खंडणी वसुली, विनयभंग अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नाशिकची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांसमोर गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हानच उभे ठाकले आहे. गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र आहे. खरे तर धार्मिक नगरी, ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराचे सामाजिक स्वास्थ सध्या बिघडले असून दिवसाढवळ्या सर्रास प्राणघातक हल्ले, मारहाण करण्याच्या घटना होत आहेत. या सर्व घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अशा आहेत गुन्हेगारीच्या घटना
  • शिवजयंतीनिमित्त उपनगर पोलीस ठाणेहद्दीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोळीबार करण्यात आला होता.
  • जुन्या भांडणातून देवळाली कॅम्प परिसरात तरुणांनी फायरिंग केली होती. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
  • फुलनेगरमध्ये दहशत निर्माण करत टोळक्याने कोयत्याने हल्ला करत गोळीबार केला.
  • अंबडमध्ये टवाळखोरांनी हत्यारे घेऊन नागरिकांच्या घरांवर दगडफेक करीत दहशत माजविली
  • बजरंगवाडीत वर्चस्ववादातून दोन गटात राडा झाला.
  • खंडणी न दिल्याने सराईत गुन्हेगाराने नेहरू गार्डन परिसरात मोटारीची जाळपोळ केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -