नाशिक शहरात दिवसभरात १९२५ नवे कोरोनाबाधित; शून्य मृत्यू

दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने दिलासा

Maharashtra Corona Update today 86 omicron postive patient found in maharashtra and 28286 new corona positive cases reported
Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आज 12500 ने घटली, मात्र 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

नाशिक : जिल्ह्यात दररोज उच्चांकी रुग्णसंख्येत वाढ होत असून, अवघ्या १३ दिवसांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २५.९९ झाला आहे. नाशिक शहरात पॉझिटिव्हिटी रेट २९.१९, नाशिक ग्रामीण १७.९२, मालेगाव २४.३५ तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांमध्ये ५८.९९ आहे.

जिल्ह्यात गुरुवारी (दि.१३)१ हजार 925 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये १ हजार 368 नाशिक शहर, 428 नाशिक ग्रामीण, ४७ मालेगाव आणि ८२ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. दिवसभरात ८१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सुदैवाने दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ४ लाख २४ हजार 768 रुग्ण बाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ८ हजार 178 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात ८ हजार ७६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ७ हजार ८२४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात नाशिक शहर ६ हजार ८८, नाशिक ग्रामीण १ हजार २८४, मालेगाव १३८ आणि जिल्ह्याबाहेरील ३१४ रुग्णांचा समावेश आहे.