”पम्मी, तुम जिती मै हारा” धनंजय मुंडे असं म्हणतील तेव्हाच…”, करुणा शर्मांची भावनिक साद

काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांनी नवीन पक्षाची घोषणा केली होती. शिवशक्ती सेना असं नवीन पक्षाचं नाव असल्याचं करुणा शर्मांनी जाहीर केलं. अहमदनगरमध्ये जानेवारी अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्यासंदर्भातील आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली.

Karuna Sharma appears in Ambajogai court
करुणा शर्मा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पुणेः गेल्या काही दिवसांपूर्वी करुणा शर्मांचं प्रकरण चर्चेत आलं होतं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंशी संबंध जोडल्यानंतर त्यावरून बरीच टीकाटिपण्णी झाली होती. आता करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी राजकीय पक्षाचीच स्थापना केलीय. त्यानंतर त्यांनी आता थेट धनंजय मुंडेंना आवाहन केलंय. ”मला अजून न्याय मिळालेला नाही. पण मी समाधानी आहे. पम्मी, तुम जिती मै हारा, जेव्हा माझे पती मीडियासमोर म्हणतील, शपथविधीत जेव्हा माझं नाव घेतली, तेव्हा मला न्याय मिळाल्याचं मी समजेन”, असंही करुणा शर्मा म्हणाल्यात. त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही भावना व्यक्त केलीय. तसेच त्यांनी एका कामगार संघटनेतही प्रवेश केलाय.

काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांनी नवीन पक्षाची घोषणा केली होती. शिवशक्ती सेना असं नवीन पक्षाचं नाव असल्याचं करुणा शर्मांनी जाहीर केलं. अहमदनगरमध्ये जानेवारी अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्यासंदर्भातील आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली. बीडमधील परळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मानस करुणा शर्मा यांनी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. तसं झाल्यास विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांना शर्मांचं आव्हान असेल.

कोण आहेत करुणा शर्मा?

गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा हिने तक्रारीत धनंजय मुंडे यांच्याशी पहिली भेट मध्य प्रदेशातील इंदुर येथे बहीण करुणा शर्मा हिच्या घरी झाल्याचे म्हटले होते. तसेच मुंडे यांनी माझी बहीण करुणा शर्मा हिच्याबरोबर 1998 मध्ये प्रेमविवाह केल्याचा गौप्यस्फोटही रेणू शर्माने केला. त्याचबरोबर मुंडेंनी आपल्यावर बलात्कार केल्याचंही तिने तक्रारीत म्हटल होतं. रेणू शर्मा प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांची राज्यात पुरती नाचक्की झाली. मुंडे यांनी करुणा शर्माबरोबर विवाह केल्याची कबुली दिली. तसेच त्यांना दोन मुलं असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंडेच्या या छुप्या लग्नाच्या बातमीने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
———————————————————
हेही वाचा : पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा?, मनसेचा व्यापाऱ्यांना धमकीवजा इशारा