घरमहाराष्ट्रनाशिकबालकाच्या डोक्यातून काढली रक्ताची गाठ

बालकाच्या डोक्यातून काढली रक्ताची गाठ

Subscribe

डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले बालक

डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात; परंतु सातपूर येथील आठ वर्षीय बालकास डॉक्टरांनी तत्परतेने वेळीच उपचार केल्याने रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे.

डोके दुखत असल्याने सातपूर गावातील रुद्र गोकुळ बंदावणे या आठ वर्षीय बालकास त्याचे आजोबा मोहन बंदावणे यांनी सातपूर कॉलनीतील रोहित हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. डॉ. संजय पाटील यांनी तपासणी केली असता काहीतरी मोठा आजार असल्याचे लक्षात आले. काही वेळातच रुग्ण बेशुध्द पडला. डॉ.पाटील यांनी त्वरित बालरोगतज्ञ डॉ.नितीन बिर्ला यांचेशी संपर्क साधून रुग्णाची कल्पना दिली. त्यांनी साफल्य रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रुग्णाची गंभीर स्थिती पाहून डॉ.बिर्ला आणि डॉ.अभिजित सांगळे यांनी बेशुद्ध अवस्थेतच अत्यावश्यक उपचार सुरू करत नाडी आणि रक्तदाब नियंत्रित केला. त्याच अवस्थेत सीटी स्कॅन देखील केले असता डोक्यात रक्ताची मोठी गाठ आढळली. तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.डॉक्टर संजय पाटील व रुग्णाच्या पालकांनी निर्णय घेऊन न्यूरोसर्जन डॉ.भूषण उबाळे यांना बोलावण्यात आले. डॉ.उबाळे यांनी शस्त्रक्रिया करून डोक्यातील रक्ताचा गोळा बाहेर काढला.

- Advertisement -

दरम्यान तीन दिवसानंतर रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर येऊन बोलायला लागला. तातडीने उपचार मिळाल्याने रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. डॉक्टरांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत तर रुग्णाला जीवदान मिळू शकते हे उदाहरणावरून सिद्ध झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -