घरमहाराष्ट्रनाशिकहिरोशिमाच्या अणुबॉम्ब किरणांपेक्षाही शंभर पटींनी अधिक प्रदूषण

हिरोशिमाच्या अणुबॉम्ब किरणांपेक्षाही शंभर पटींनी अधिक प्रदूषण

Subscribe

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच ; ग्रीन मंत्रा रिर्सोसेसचे डॉ. शर्मा यांचे प्रतिपादन

नाशिक : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. आजचे प्रदूषण पाहता हिरोशिमाच्या अणुबॉम्ब किरणांच्या उत्सर्जनापेक्षाही शंभर पटींनी वाढले आहे. त्यामुळे याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून केवळ चर्चा करून होणार नाही, तर याची अमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच असल्याचे मत ग्रीन मंत्रा रिर्सोसेस लिमिटेडचे संचालक डॉ. उमेशकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

‘आपलं महानगर’ च्या कार्यालयात विराजमान ‘वंदे मातरम बाप्पां’ची आरती डॉ. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी वाढत्या प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या वातावरण बदलाचा अनुभव आपण घेत आहोत. एकिकडे महाराष्ट्रात अतिवृष्टी होत आहे तर, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. हे का होतयं तर पर्यावरणाचा होणार प्रचंड र्‍हास. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याकरीता दोन उपयांवर भर देणे क्रमप्राप्त आहे. एक म्हणजे झाडे लावणे अन दुसरे म्हणजे सार्वजनिक वाहतूकीव्दारे प्रवास करणे म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदुषण कमी होईल.

- Advertisement -

परंतू, या गोष्टी केवळ न बोलता त्याचा प्रत्यक्षात प्रत्येकाने अवलंब करणे तितकेच महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. आज औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उद्योग, कारखाने उभे राहत आहेत. कारखान्यांव्दारे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते, पण आज उद्योगांचीही आवश्यकता आहेच याकरीता कारखाने सुरू करतांना पर्यावरणाच्या निकषही पाळणे गरजेचे आहे. याकरीता केंद्र व राज्य सरकारने कायदेही केले आहेत. प्रदुषण नियंत्रण महामंडळामार्फत अशा कारखान्यांवरील प्रदुषणवर नियंत्रण ठेवले जाते. परंतू, अलीकडच्या काळात एक महत्वपूर्ण बदल दिसून आला तो म्हणजे कारखनदारांकडूनच पर्यावरणाला कोणताही धोका न पोहचवता सर्व नियंमांचे पालन करूनच उद्योग निर्मिती केली जात आहे. आपल्या पुढच्या पिढीलाही पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जनजागृती करून अवगत करणे आवश्यक असल्याचेही डॉ. शर्मा यांनी सांगितले.

‘आपलं महानगर’ दरवर्षी पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त करतांना नागरिकांनीही पर्यावरणस्नेही उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले. गणेशमूर्ती गोदापात्रात विसर्जन न करता कृत्रिम तलावात किंवा मूर्तीदान कराव्यात. पुजाविधीसाठी वापरलेले साहित्य रस्त्यात कुठेही न टाकता संकलन केंद्रात जमा केल्यास खत निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल. त्यामुळे नागरिकांनी बाप्पांचे पर्यावरणपूरक विसर्जन करावे, असे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -