घरमहाराष्ट्रनाशिकमद्यधुंद टेम्पोचालकाची रिक्षाला धडक

मद्यधुंद टेम्पोचालकाची रिक्षाला धडक

Subscribe

चक्काचोर रिक्षाने घेतला पेट; प्रवासी महिला ठार, सहाजण होरपळले

नाशिक-पुणे महामार्गावर मद्यधुंद टेम्पोचालकाने भरधाव वेगाने टेम्पो चालवत दोन दुचाकींसह रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात प्रवासी महिला जागीच ठार झाली असून सहाजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (सायंकाळी) ५ वाजता सिन्नर येथील आडवा फाटा परिसरात घडली. अपघातानंतर रिक्षाने पेट घेतल्याने दोनजण होरपळले असून रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथील आडवा फाटा येथे आयशर आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात. अपघात होताच रिक्षाने पेट घेतला. यात एक महिला ठार तर इतर सहा गंभीर जखमी झाले.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 14, 2019

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पोने (एमएच 14, एचजी 1399) दुचाकीसह रिक्षाला (एमएच 15, एफयु 3950) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाच्या पेट्रोल टॅकचा स्फोट झाला. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला जागीच ठार झाली असून तीनजण होरपळले आहेत. त्यामध्ये एका वयावृद्ध महिलेचा समावेश आहे. टेम्पोने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत तीनजण जखमी झाले.


हे देखील वाचा – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

- Advertisement -

पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक निरीक्षक राजेंद्र रसेड व स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु करत जखमींना उपचारासाठी यशवंत रुग्णालयात दाखल केले आहे. तीनजणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. टेम्पोचालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पेट्रोल पंपावरील कर्मचारी, सिन्नर नगरपालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाने पाणी मारत रिक्षाला लागलेली आग आटोक्यात आणली. स्थानिकांनी रिक्षा तोडून जखमींना बाहेर काढले. अपघातानंतर नाशिक-पुणे महामार्गावर वाहतुककोंडी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -