घरताज्या घडामोडीघाटनदेवी मंदिरासमोरील अपघातात पूजारी ठार

घाटनदेवी मंदिरासमोरील अपघातात पूजारी ठार

Subscribe

मुंबई-नाशिक महामार्गावर दुर्घटना, चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने झाला अपघात

इगतपुरीतील घाटनदेवी मंदिरासमोरील दुकानात भरधाव पीकअप शिरल्याने या अपघातात मंदिराचे पूजारी भेडियासिंग बाबा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, चार व्यक्ती जखमी झाले. नवरात्रोत्सवानंतर गर्दी कमी झाल्याने सुदैवाने मोठी प्राणहानी टळली.

मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरासमोर ही घटना घडली. या ठिकाणी असलेल्या पूजा साहित्याच्या दुकानात अनियंत्रित पीकअप धडकली. गाडी वेगात असल्याने बॅरिकेड्स तोडून पीकअप थेट दुकानात शिरली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -