Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र सरकारवाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : २१ वर्षीय मुलीची घरवापसी

सरकारवाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : २१ वर्षीय मुलीची घरवापसी

आई रागावल्याने सोडले घर; समुपदेशानंतर मिटला वाद

Related Story

- Advertisement -

नाशिक : कुटुंबात होणार्‍या घुसमटीस अल्पवयीन मुलामुलींवरही विपरीत परिणाम होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रागाच्या भरात २१ वर्षीय रात्रीच्या वेळी एकटीच ठक्कर बाजार बसस्टॅण्डवर आली. सुदैवाने पोलिसांनी तिला वेळीच ताब्यात घेतले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी एकटीच घराबाहेर येण्याचे कारणही तिने पोलिसांना सांगितले. ते ऐकूण पोलिसांनाही धक्का बसला. सावत्र आई सारखे टोमणे व शिवीगाळ करत असल्याने रागाच्या भरात घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
घरातून रागाच्या भरात ठक्कर बाजार बसस्टॅण्ड येथे आलेली एक मुलगी विनापालक मंगळवारी (दि.१४) रात्री ११.३० वाजता ठक्कर बाजार बीट चौकीचे पोलीस अंमलदारांना दिसली. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिला पोलीस शिपाई सोनवणे मुलीची चौकशी केली. तिने नाव सोनी अशोक पंडित (वय २१, रा.वडाळा भोईल, जैन होस्टेलजवळ, चांदवड) असे सांगितले. सावत्र आई तिला नेहमी टोमणे व शिवीगाळ करत असल्याने रागाच्या भरात घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात आले. पोलीस ठाण्यात मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर ती तिच्या वडिलांसोबत जाण्यास तयार झाली. तसेच तिच्या वडिलांचा देखील जबाब नोंद करण्यात आला. पोलिसांनी त्यांचे आधारकार्ड पडताळणी करून तिला सुखरूपपणे त्यांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -