Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक त्र्यंबकेश्वरात दररोज हजारो किलो फुलांच्या निर्माल्यापासून बनते अगरबत्ती

त्र्यंबकेश्वरात दररोज हजारो किलो फुलांच्या निर्माल्यापासून बनते अगरबत्ती

Subscribe

नाशिक : त्र्यंबकेश्वराच्या चरणी दररोज हजारो टन निर्माल्य संकलित होते. या निर्माल्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यातून तुंगार मंडळी ट्रस्टने या निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

त्र्यंबकराजाच्या चरणी दररोज हजारो भाविक येतात. त्यांनी देवाला अर्पण केलेली फुले संकलित केली जातात. तसेच, त्रिकाल पूजा, प्रदोष पुष्प पूजा करताना वाहिलेल्या फुलांचे आणि बेलाच्या पानांचे निर्माल्य तयार होत असते. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील निर्माल्याचे काय करायचे, असा प्रश्न होता. एकदा वाहिलेली फुले वाहून गायत्री मंदिराच्या बाजूस टाकली जातात. त्यांचा पुनर्वापर होऊ नये, यासाठी ते निर्माल्य यंत्राच्या सहाय्याने दळण्यात येतात. या तयार झालेल्या सेंद्रिय पदार्थांपासून अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी तुंगार मंडळी ट्रस्ट यांनी हाती घेतला आहे.

- Advertisement -

यासाठी पुणे येथील थर्ड व्हेव टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीने अगरबत्ती आणि हवन पूजा यात वापरले जाणारे साहित्य तयार करण्यात येत आहेत. यापूर्वी या संस्थेच्या माध्यमातून अष्टविनायकापैकी तीन गणेश मंदिरांच्या ठिकाणी निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त देहू येथील निर्माल्य घेतले जाते. अगरबत्ती विक्रीतून येणार्‍या उत्पन्नातून ५० टक्के रक्कम देवस्थान ट्रस्टच्या लोकहितार्थ कामांसाठी दिली जाते.

अंबोली येथे होते क्रशिंग

त्र्यंबकेश्वर जवळील अंबोली येथे पारनेरकर यांच्या जागेत अगरबत्तीनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या नाशिक येथे निर्माल्य क्रशिंग करून पुणे येथे अगरबत्ती बनविण्याचे काम करणार्‍या कंपनीकडे पाठवले जाते. कंपनी अगरबत्ती तयार करुन ट्रस्टला पाटवते. सुमारे ३१० रूपये किलो दराने ही अगरबत्ती विक्री केली जाते. सध्या पाच रूपयांत भाविकांना मंदिर परिसरात दिली जाते. भविष्यात मोफत वितरण करण्याचा देवस्थान विश्वस्तांचा मानस असल्याचे विश्वस्त कैलास घुले यांनी सांगितले.

गोदाप्रदूषण टाळण्याहेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भाविक श्रद्धेने फुल अर्पण करतात. त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला कुठेही ठेच लागू नये, याचा विचार करून निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या माध्यमातून अगरबत्ती आणि त्यापासून निर्माण होणार्‍या भस्माचाही भाविक पूजेसाठी वापर करू शकतात. : मनोज तुंगार, विश्वस्त, तुंगार ट्रस्ट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -