घरमहाराष्ट्रनाशिकअजित पवारांच्या पुतळ्याची गाढवावरुन धिंड

अजित पवारांच्या पुतळ्याची गाढवावरुन धिंड

Subscribe

नाशिक : अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत असताना नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने जोरदार आंदोलन केले. निफाड तालुक्यातील ओझर येथे भाजपा ग्रामीणच्या वतीने अजित पवार यांच्या पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढण्यात आली.

भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वात ओझर इथे झालेल्या आंदोलनावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचसोबत अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गाढवावर बसवून त्या प्रतिकात्मक पुतळ्याची ओझर शहरात धिंड काढण्यात आली. यावेळी, अजित पवार मुर्दाबाद, अजित पवार हाय हाय, अजित पवारांचा निषेध असो, धर्मद्रोही राष्ट्रवादीचा धिक्कार असो, राजीनामा द्या राजीनामा द्या अजित पवार राजीनामा द्या अश्या पद्धतीच्या घोषणा देत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा निषेध नोंदवण्यात आला. त्याच सोबत धर्मवीर संभाजीराजेंचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी अश्या घोषणा देत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

- Advertisement -

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी तब्बल ४० दिवस मरणयातना सहन केल्या. पण, धर्माशी एकनिष्ट राहिले. अश्या थोर महापुरुषाला धर्मवीर म्हणायचे नाही असे वक्तव्य करणार्‍या अजित पवार यांनी एकप्रकारे धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमानच केला आहे. त्यांनी तात्काळ शिव-शंभू प्रेमी जनतेची माफी मागावी तसेच विरोधी पक्षनेते पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -