व्हॅन मधून उतरली अन अघटित झाल; ८ वर्षीय चिमुकलीचा स्कूल व्हॅनखाली येऊन अंत

नाशिक : नाशिकरोड उएथील जेलरोड परिसरातील पवारवाडी याठिकाणी अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. स्कूल व्हॅन खाली चिरडून एका ८ वर्षीय चिमूरडीचा अंत झाला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव या ८ वर्षीय चिमूरडीला तिलाच शाळेतून घरी सोडायला आलेल्या व्हॅन खाली चिरडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भालेराव कुटूंबाची अत्यंत लाडक्या परीचा अश्या पद्धतीने त्यांच्याच दारात मृत्यू झाल्याने त्यांना हंबरडा फोडला होता.

मिळालेल्या माहिती नुसार, नवीन मराठी शाळा येथून स्कूल व्हॅन अपेक्षा नवज्योत भालेराव हिला व अन्य विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. जेलरोड परिसरातील पवारवाडी येथील हरिओम दर्शन सोसायटी याठिकाणी तिला सोडायला व्हॅन पोहचली. अपेक्षा व्हॅन मधून उतरली. व्हॅन चालकाला वाटले की ती घराकडे गेली असावी. मात्र, अपेक्षा व्हॅनच्या मागच्या बाजूने घराकडे जात होती. तेवढ्यात व्हॅन वळवण्यासाठी चालकाने व्हॅन रिव्हर्स मागे घेतली. व्हॅनच्या मागे असलेल्या अपेक्षाला धडक बसत ती थेट टायर खाली चिरडल्या गेली. घरच्या समोरच ही घटना घडल्याने कुटुंबीयांनी तिला तात्काळ जयरामभाई रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात जावोपर्यंत बऱ्याच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासात अखेर मृत घोषित केले. यानंतर भालेराव कुटुंबाने एकच हंबरडा फोडल्याने संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. दरम्यान, याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार भोळे पुढील तपास करीत आहे.