घरमहाराष्ट्रनाशिकमनमानी: नाशिक शहरातील १० शाळांची चौकशी गुलदस्त्यात

मनमानी: नाशिक शहरातील १० शाळांची चौकशी गुलदस्त्यात

Subscribe

शासन शर्तीचे उल्लंघन करणार्‍या संस्थावर बंदी घाला : साळुंखे

नाशिक : शहरातील मनमानी कारभार करणार्‍या १० शाळांची चौकशी गुलदस्त्यात असून, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ही चौकशी पूर्ण करून संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाशिक पॅरेट्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली. या मागणीमुळे शिक्षण संस्थांच्या मनमानीचा आणि त्याकडे डोळेझाक करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांचा मुद्दाही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

इगतपुरी दौर्‍यावर असलेल्या शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट घेत शिष्टमंडळाने विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यासंदर्भात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही पालक संघटनेने २०२० मध्ये निवेदन दिले होते. त्यावर राज्यमंत्री कडू यांनी शाळांची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. मात्र अनेक शाळांच्या बाबतीत गंभीर तक्रारी असतानाही स्थानिक शिक्षणाधिकारी कायदेशीर कारवाई करत नसल्याने आजही प्रकरण प्रलंबित आहे.

- Advertisement -

आतापर्यंत अनेक शाळांची चौकशी झाली मात्र अंतिम निर्णय न झाल्याने त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित राहतात. याला निगरगट्ट अधिकारी कारणीभूत असल्याने त्यांची नाशिक विभागातून तत्काळ बदली करावी, तसेच पालकांच्या तक्रारींबाबत तातडीने चौकशी व कारवाई करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश साळुंखे, प्रदीप यादव, हरिष वाघ, मनीष शिरसाठ, भावसार उपस्थित होते.

या शाळांबाबत तक्रारी

नाशिक केंब्रिज स्कूल (इंदिरानगर), सेंट लॉरेन्स स्कूल (सिडको), सेंट फ्रान्सिस (राणेनगर), होली फ्लॉवर (नाशिकरोड), सिल्वर ओक स्कूल (शरणपूररोड), विज्डम हाय इंटरनॅशनल (दोन्ही बोर्ड, गंगापूर रोड), गुरुगोविंद पब्लिक स्कूल (इंदिरानगर), सेंट फ्रान्सिस स्कूल (तिडके कॉलनी), अशोका युनिवर्सल स्कूल (वडाळा परिसर)

पालक शाळांबाबत तक्रारी करतात मात्र, कारवाईत दिरंगाई केली की पालक गप्प बसतात असा शिक्षण विभागातील अधिकार्‍याचा समज आहे. परंतु, आमच्या तक्रार अर्जावर 15 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय होऊन कारवाई न झाल्यास नाशिक शिक्षण विभागातील एकही अधिकार्‍याला त्यांच्या खुर्चीत बसू देणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही माघार घेणार नाही.
– नीलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेट्स असोसिएशन

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -