घरक्राइमवेतन मागितल्याने मारहाण; वॉटर ग्रेसच्या कर्मचार्‍यांचा ठेकेदारांविरोधात आक्रोश

वेतन मागितल्याने मारहाण; वॉटर ग्रेसच्या कर्मचार्‍यांचा ठेकेदारांविरोधात आक्रोश

Subscribe

नाशिक : शहरात वॉटर ग्रेस ठेकेदारामार्फत स्वच्छता कर्मचार्‍यांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप करत सफाई कर्मचार्‍याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत सफाई कर्मचार्‍यांनी ठेकेदाराविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. यावेळी संबधितांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

नाशिक शहरात ठिकठिकाणी साफसफाई करण्याचा ठेका वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. तीन वर्षासाठी हा ठेका देण्यात आला असून कंपनीकडे ७०० कामगार काम करतात.सकाळी पाच वाजेपासून ते सात वाजेपर्यंत हे सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. मात्र या कंपनीच्या ठेकेदाराकडून भरती केलेल्या स्वच्छता कर्मचार्‍यांकडून कुठलीही तरतूद नसताना रक्कम घेतली जात असल्याचा मुद्दा आंदोलनाच्या माध्यमातून समोर आला आहे. तसेच कर्मचार्‍यांना देण्यात येत असलेल्या पगारापेक्षा कमी वेतन दिले जात असल्याचा आरोप करत वॉटर ग्रेस कंपनीचा हा ठेका रद्द करण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली आहे. ठेकेदारांकडून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने सफाई कर्मचार्‍यांकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान सफाई कर्मचारयांनी एकजूट दाखवल्याने काही कर्मचारयांना वॉटर ग्रेसच्या कार्यालयात ठेकेदारांनी बोलावून घेतल्याचे समजते. यावेळी वेतनाचा मुददा मांडला असता या कर्मचारयांना ठेकेदाराकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप यावेळी कर्मचार्‍यांनी केला. ठेकेदारांकडून कर्मचार्‍यांचा निम्मा पगार काढून घेत जात असल्याचा आरोप सफाई कर्मचार्‍यांकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून दिवाळीचा जो बोनस असतो. एक पगार महानगरपालिका प्रशासन ते ठेकेदार या मुलांच्या अकाउंटला जमा करत होती. यांच्या खात्यातून तो बोनसही काढून घेतला जायचा. गेली दोन वर्ष यांना दिवाळीचा बोनसच मिळालेला नाही, अशी माहिती मनसेचे दिलीप दातीर यांनी दिली आहे. यावेळी मनसेच्या माध्यमातून सफाई कर्मचार्‍याकडून आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -