घरमहाराष्ट्रनाशिकमजूर मृत्यूप्रकरणी बिल्डर सुजय गुप्ताचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मजूर मृत्यूप्रकरणी बिल्डर सुजय गुप्ताचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Subscribe

आता कधीही होणार अटक;'अपना घर' दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी

ध्रुवनगरमधील सम्राट ग्रुपच्या ‘अपना घर’ गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी फुटली. या दुर्घटनेत चार कामगारांच्या मृत्यू झाला. मुख्य संशयित आरोपी बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता फरार आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होत. या अर्जावर काल सोमवारी (ता.८) सुनावणी झाली असून आज नाशिक सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असून आता पोलिसांसमोर फरार आरोपी सुजय गुप्ता याला पकडण्याचे आव्हान आहे.

अपना घर गृहप्रकल्प दुर्घटनेत पाण्याच्या टाकीसाठी महापालिका नगररचना विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ठेकेदार भाविन पटेल, आशिष सिंग, सचिन शेवडे, नारायण कडलग यांना अटक केली आहे. गुप्ता फरार आहे. गुप्ताच्या वतीने अ‍ॅड.जयदीप वैशंपायन कामकाज पाहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -