घरमहाराष्ट्रनाशिकआंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन

आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन

Subscribe

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे यश

नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केलेल्या आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि.२२) कर्मयोगीनगर येथील जॉगिंग ट्रॅकच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आंदोलनाची त्वरित दखल घेवून महापालिकेने संबंधित कंपनीकडून काम सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त होत आहेत. १५ महिन्यांपासून हे काम रखडले होते.

प्रभाग २४ मधील गोविंदनगर, कर्मयोगीनगरच्या जॉगिंग ट्रॅकचे काम त्वरित सुरू करावे, गतिरोधक बसवावेत, रस्ते, उद्यानांची दुर्दशा थांबवावी यांसह विविध मागण्यांसाठी बुधवारी नागरिक रस्त्यावर उतरले होते. आर. डी. सर्कल येथे ही निदर्शने करण्यात आली. समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याची महापालिकेने त्वरित दखल घेतली, आर. डी. मायनिंग इक्विपमेंट कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

त्यानुसार या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. २२) बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे संचालक राहुल देशमुख, शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, धवल खैरनार, संगीता देशमुख, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, बापूराव पाटील, रवींद्र सोनजे, आर. आर. जाधव, दिलीप निकम, अशोक गाढवे, विनोद पोळ, माधव माळी, कृष्णाजी विसाळे, रमेश गावीत, राजमाता जिजाऊ हास्य क्लबच्या सदस्या छाया नवले, भारती देशमुख, रंजना सुर्वे, कांचन महाजन, सुरेखा बोंडे, वंदना पाटील, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) उपस्थित होते.

१५ महिन्यांपासून काम रखडले होते

कर्मयोगीनगर येथे जॉगिंग ट्रॅक विकसित करणे, मोकळ्या जागेत सुशोभिकरणाचे काम महापालिकेने आर. डी. मायनिंग कंपनीला सीएसआर फंडातून दिले आहे. याबाबत स्थायी समिती विषय व ठराव ९ सप्टेंबर २०२१ रोजीच मंजूर करण्यात आला आहे. तेव्हाच सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. 15 महिने उलटूनही काम सुरू होत नव्हते. अखेर बुधवारी झालेल्या आंदोलनानंतर गुरुवारी भूमिपूजन होवून काम सुरू झाले.

- Advertisement -

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -