घरमहाराष्ट्रनाशिकगुजरात विधानसभेतील विजयाचा भाजपकडून जल्लोष

गुजरात विधानसभेतील विजयाचा भाजपकडून जल्लोष

Subscribe

१८२  जागांपैकी १५६ जागांवर भाजप

नाशिक : गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा १८२  जागांपैकी १५६ पेक्षा अधिक जागांवर भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळविल्याबद्दल भारतीय जनता पक्ष, नाशिक महानगराच्या वतीने भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नरेंद्र मोदी जिंदाबाद.. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोंदी जैसा हो.. भारत माता की जय… वंदे मातरम .. अशा घोषणांनी दणाणून गेला होता.

या जल्लोषाप्रसंगी भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव रेहान मेमन, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, जगन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, रोहिणी नायडू, काशिनाथ शिलेदार, अरुण शेंदुर्णीकर, सागर धर्माधिकारी, सुरेश पाटील, चंद्रकांत थोरात, फिरोज शेख, माधवी पढार,विजय बनछोडे, शाहिन मिर्झा, शिवाजी गांगुर्डे, प्रा. कुणाल वाघ, रुची कुंभारकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -