घरताज्या घडामोडीभाजपची उद्योग आघाडी शिवसेनेत

भाजपची उद्योग आघाडी शिवसेनेत

Subscribe

खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत मुंबईतील सेना भवनात रंगला सोहळा

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर नाशिकमधील भाजप उद्योग आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवसेना भवनमध्ये हा सोहळा पार पडला. धुळे आणि नाशिकमधील भाजपचे अनेक नेते नाराज असून लवकरच ते शिवसेनेत येणार असल्याचे सुतोवाचही खासदार राऊत यांनी यावेळी केला.
नवनिर्वाचित महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह शिवसेना नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या उद्योग आघाडीतील कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी राऊत यांनी चौफेर फटकेबाजी करत राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना भवनच असणार आहे, असा गौप्यस्फोट केला. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे दोन्हीही शहरे महत्वाची आहेत. नाशिकच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. नाशिक कायम सेनेचा बालेकिल्ला. मागच्या 5 वर्षात काय झालं ते सोडा, आता काय होणार आहे ते पाहा, असेही ते म्हणाले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -