घरमहाराष्ट्रनाशिकबॉटनीकल गार्डन रामभरोसे; सुरक्षारक्षक नेमण्याची मनसेची मागणी

बॉटनीकल गार्डन रामभरोसे; सुरक्षारक्षक नेमण्याची मनसेची मागणी

Subscribe

नवीन नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या पं. जवाहरलाल नेहरू बॉटनीकल गार्डनची प्रचंड दुरावस्था झाली आहे. हे उद्यान आता गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. या उद्यानाच्या दूरवस्थेप्रश्नी मनसे आक्रमक झाली असून, बॉटॅनिकल गार्डनमध्ये कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी मनसेच्या वतीने वनविभागाकडे करण्यात आली.

राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून उद्योगपती रतन टाटा यांच्या सीएसआर फंडातून पांडवलेणीच्या पायथ्याशी बॉटनीकल गार्डन साकारण्यात आले. विशेष म्हणजे या गार्डनला उद्योगपती रतन टाटा यांनी भेट दिली. अनेकविध वैशिष्ठ्यांमुळे अल्पावधीतच हे उद्यान नाशिककरांच्या पसंतीस उतरले. परंतु, सत्तांतरानंतर या गार्डनकडे दुर्लक्ष झाले. आता तर बॉटनीकल गार्डन गुन्हेगारांचा, टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी लक्ष घालून तात्काळ गुन्हा दाखल करावा.

- Advertisement -

यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी नगरसेवक सलीम शेख, शहर समन्वयक सचिन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -