घरताज्या घडामोडीसीए परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले

सीए परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले

Subscribe

इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस ऑफ इंडिया (आयसीएआय)तर्फे सोमवारी (दि.3) सीए इंटर व फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिकची विद्यार्थ्यांनी अमिना काची हिने इंटरमिडयटच्या नवीन अभ्यासक्रमातील दोन्ही ग्रुप एकाचवेळी उत्तीर्ण करून लक्षवेधी यश संपादन केले आहे.

आयसीएआयतर्फे नोव्हेंबर 2019 मध्ये सीए फाउंडेशन व इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आली होती. सीए इंटर परीक्षेत राकेश चौधरी, रुक्सार बूटवाला, चित्रा विरवाणी, मोहीत धमेछा, यांनी ग्रूप एक उत्तीर्ण करून यश संपादन केले. तर सीए फाउंडेशनमध्ये निखिता गोडसे, निकिता चव्हाण, अमृता कर्पे, सेजल माहेश्वरी, तूषार लिलाणी, नमन बागमार, अर्चित भडकमकर, केतकी गुजराथी, नीती जठाण, साबीया शेख, फातिमा मोंडे, योजना पाटील, अथर्व परदेशी आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. नाशिकमधून इंटरमिडियट परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमासह 327 विद्यार्थ्यांनी ग्रूप एकची परीक्षा दिली होती. त्यापैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ग्रूप दोनसाठी प्रविष्ठ 128 पैकी26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रपसाठी एकाच वेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -