घरमहाराष्ट्रनाशिकजाती-धर्मांत वाद पेटवणे हाच मुख्यमंत्र्यांचा उद्योग

जाती-धर्मांत वाद पेटवणे हाच मुख्यमंत्र्यांचा उद्योग

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याच स्वरूप होतं, पण मुख्यमंत्र्यांनी याच्या पूर्णपणे उलट काम केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राज्यामध्ये विकास कुठे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ जाती धर्मांमध्ये वाद पेटवण्याचं काम केले. एखादा समाज आरक्षणाच्या मागणासाठी पुढे आला की, त्याचा विरोध करण्यासाठी दुसरा समाज पुढे कसा येईल हेच उद्योग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याच स्वरूप होतं, पण मुख्यमंत्र्यांनी याच्या पूर्णपणे उलट काम केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. नाशिक येथे मंगळवारी (दि.९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, सातार्‍याच्या गादीने पेशवाईची वस्त्र देण्याची परंपरा आहे. या परंपरेचा इतिहासात उल्लेख आहे. त्याचा दाखला शरद पवारांनी केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढत जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. सध्या या परंपरेच्या अगदी उलटे काम होत आहे. विरोधकांकडून नेते आयात करण्याची वेळ आज भाजपवर आली. पाच वर्ष सत्तेत राहूनही दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करावे लागतात, हे भाजपचं दुर्देवच म्हणावं लागेल. इतके करून सुद्ध पंतप्रधानांना राज्यात सभा घ्यावी लागत आहे. याचाच अर्थ भाजपने यंदाच्या निवडणुकीत आघाडीचे आव्हान असल्याचे मान्य केल्याचेच दिसून येते, म्हणूनच आमच्या शक्तीस्थळांवर हल्ला केला जात असल्याचा त्यांनी आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणातून शरद पवार आणि त्यांच्या परिवारावर सातत्याने हल्ला चढवत आहे. आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. मात्र, पंतप्रधान मोदींनी प्रचाराची खालची पातळी गाठल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

भाजपने माफीनामा काढावा

भाजपच्या जाहीरनाम्याविषयी पाटील म्हणाले, आज शेतमालाला भाव नाही, कांदा उत्पादकांचे प्रश्न, पाच वर्षात पाच वेळा झालेली वीजदरवाढ, तीन वेळा केलेली खतांची दरवाढ यामुळे शेतकरी वर्गात या सरकारविषयी प्रचंड रोष आहे. आदिवासी बांधवांनी मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढला; परंतु या सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आल्याचे सांगत भाजपने जाहीरनामा नव्हे माफीनामा काढावा, असा आरोप त्यांनी केला.

यंत्रणा भाजपच्या दावणीला

निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरी छापे टाकून त्यांच्या चौकशा लावून बदनामी करण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचे दिसून येते. मध्यप्रदेशमध्येही आमच्या नेत्यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या. अनेकांना कारवाईचा धाक दाखवला जातो आहे. प्रशासकीय यंत्रणा भाजपने दावणीला बांधली असून निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.

- Advertisement -

भाजप, आरएसएसचे संकट दूर करा : कवाडे

आज देशात असंवैधानिक गोष्टी घडत आहेत. पंतप्रधानांच्या आडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत आहे. देशात दहशतीचे वातावरण तयार करून विरोधकांना नामोहरम तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाच वर्षात भाजपनं नौटंकी केली; परंतु जनता आता हे खपवून घेणार नाही. सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आम्ही सर्वपक्ष एकत्र आलो. अनेकांनी सेक्युलर मतांचे विभाजन व्हावे याकरता बी टीम स्थापन केल्याचे सांगत पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांचे नाव न घेता टीका केली.

विखे काँग्रेसच्या प्रचारात : थोरात

काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी होर्डींगवरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची छबी गायब झाल्याचे विचारताच केवळ विखेंचे छायाचित्र नाही म्हणून विपर्यास करू नये, असे आमदार थोरात यांनी विखे सांगितले. त्याचबरोबर ते आघाडीच्या नगरमधील उमेदवारांचा जोरात प्रचार करत असल्याचा उपरोधिक टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -