घरमहाराष्ट्रनाशिकमद्यविक्री परवाना नुतनीकरणाच्या आमिषाने १८ लाखांना गंडा

मद्यविक्री परवाना नुतनीकरणाच्या आमिषाने १८ लाखांना गंडा

Subscribe

अमरावती येथील तिघांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी दाखल केला फसवणुकीचा गुन्हा

नाशिक शहरातील बंद पडलेले देशी दारू दुकान परवाना नुतनीकरण करण्याचे आमिष तिघांनी एकाला दाखवले. त्या बदल्यात त्याच्याकडून १८ लाख १३ हजार रुपये घेतले. मात्र, पैसे देऊनही परवाना नुतनीकरण न झाल्याने फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच जगन्नाथ विठ्ठल पाटील (रा. जळगाव) यांनी भद्रकाली पोलीसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून राकेश मधुकर देशपांडे, रंजना राकेश देशपांडे व दामोदर वामन माथाने (सर्व रा. अमरावती) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथे एका महिलेच्या नावावर परवाना असलेले देशी दारूचे दुकान नुतनीकरण न केल्याने बंद पडले आहे. हा परवाना पाटील यांच्या नावे करून पुन्हा नव्याने सुरू करून देतो, असे आमिष संशयितांनी पाटील यांना दाखवले. त्याबदल्यात १८ लाख १३ हजारांची मागणी पाटील यांच्याकडे केली. त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांनी ती रक्कम दिली. मोठी रक्कम देऊनही परवाना नुतनीकरण होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर मिळाले. शेवटी त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक गिरी तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -