बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

Leopard attack

इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते-दरेवाडी येथील १० वर्षीय चिमुकल्यावर सोमवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजेदरम्यान बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दीपक विठ्ठल गावंडा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक गावंडा बकर्‍यांना गवत चारत होता. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्या हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.