घरताज्या घडामोडीयेवल्यातील पारेगाव बनले कोरोना हॉटस्पॉट

येवल्यातील पारेगाव बनले कोरोना हॉटस्पॉट

Subscribe

तीन दिवसांपासून लॉकडाऊन, केवळ जीवनावश्यक सेवा सुरू

नाशिक : येवला तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसगणिक वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यातच आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे तीन दिवसांपासून पारेगाव संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

येवल्यात सध्या ८९ अॅक्टिव्ह कोरोनाबाधित असून, त्यातील १६ रुग्ण हे येवला शहरातील आहेत. दरम्यान, पारेगावात १० कोरोनाबाधित आढळून आल्याने तीन दिवसांपासून गावातील व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे येवला पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरते की काय, अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे मंगळवारी (दि.१८) जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत अधिक सतर्कता बाळगली जाते आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -