घरताज्या घडामोडीनाशकात करोनाचा तिसरा बळी; मृताच्या नातेवाईकाचे मुंबई कनेक्शन

नाशकात करोनाचा तिसरा बळी; मृताच्या नातेवाईकाचे मुंबई कनेक्शन

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनास गुरुवारी (दि.२१) सकाळी ४ पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये नाशिक शहर दोन , मालेगाव व निमोण (ता.संगमनेर) येथील एकाचा समावेश आहे. अंबड लिंक रोड संजीवनगर, सातपूर येथील रहिवाशी अंत्यविधीसाठी मुंबईत गेला होता. ते परत आल्यानंतर त्यांच्या वडिलांना त्रास होवू लागल्याने मंगळवारी (दि.१९) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा रुग्णालयात अस्वस्थ प्रकृतीमुळे तासाभरात मृत्यू झाला. ते पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्रशासनास गुरुवारी (दि.२१) प्राप्त झाला आहे. नाशिक शहरात आता ५० करोनाबाधित असून तीनजणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनास गुरुवारी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेला हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील २० वर्षीय तरुण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दरम्यान, प्रशासनास आणखी तिघेजण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये अंबड लिंक रोड परिसरातील ७३ वर्षीय वृध्द व्यक्ती, मालेगाव शहरातील ५० वर्षीय पुरुष आणि निमोण (ता.संगमनेर) येथील ७८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. अंबड लिंक रोड संजीवनगर, सातपूर येथील ७३ वर्षीय वयोवृद्धास हृदयविकास व मधुमेह उपचारार्थ मंगळवारी (दि.१९) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दम लागत असल्याने त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत उपचार सुरु होते. मात्र,त्यांनी अस्वस्थ प्रकृती असल्याने उपचारास साथ दिली नाही. मंगळवारीच जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या एक तासात त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातर्फे त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह गुरुवारी प्रशासनास प्राप्त झाला. ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयात ४५ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये १५ बाधित व २० संशयित रुग्ण आहेत.

- Advertisement -

अंत्यविधीसाठी मृत रुग्णाच्या मुलाचा मुंबई प्रवास

अंबड लिंक रोड संजीवनगर, सातपूर येथील रहिवाशी २ मे रोजी अंत्यविधीसाठी मुंबईत गेले होते. तेथून ५ मे रोजी नाशकात आले. मंगळवारी (दि.१९) त्यांच्या वडिलांना त्रास होवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, त्यांच्या संपर्कातील २० व्यक्तींना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने संजीवनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -