घरताज्या घडामोडीकोरोना संशयित रुग्णाचा धसका : जिल्हा रुग्णालयात पोलीस तैनात

कोरोना संशयित रुग्णाचा धसका : जिल्हा रुग्णालयात पोलीस तैनात

Subscribe

कोरोना संशयित रुग्ण शनिवारी (दि.४) जिल्हा रुग्णालय प्रशासनाला गुंगारा देवून फरारी झाला होता. त्यानंतर शहर व ग्रामीण पोलिसांनी शोधमोहीम राबवत पकडून रात्री रुग्णालयात आले. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुरक्षेची मागणी जिल्हा रूग्णलयाने केल्यानंतर दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सर्दी, खोकला आणि श्वास घेण्याचा त्रास होत असलेला १९ वर्षाचा युवकास शुक्रवारी (दि.३) रात्री जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तो मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील आहे. शनिवारी दुपारी (दि.४) त्याच्या तपासण्या सुरू करण्यात आल्यात. छातीचा एक्स रे काढण्यासाठी त्यास एक्स रे रूमजवळ नेण्यात आले. तितक्यात त्याने सर्वांची नजर चुकवून पळ काढला. ही बाब समजताच सर्वांची पळापळ झाली. त्याचा अहवाल निगेटीव्ह असल्याचा दावा जिल्हा रुग्णालयाने केला आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गंभीर दखल घेत असे प्रकार पुन्हा घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हा शासकिय रूग्णालय प्रशासनाला दिले आहेत. त्यानसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तातडीने पत्र पाठवून पोलीस आयुक्तांकडे जिल्हा रूग्णालयात सुरक्षेसाठी पोलीस देण्याची मागणी केली. त्यानुसार रविवारी (दि.५) जिल्हा रूग्णालयात दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -