घरताज्या घडामोडीव्यापार्‍याच्या घरात ३५ लाखांच्या ऐवजावर डल्ला; भरदिवसा चोरट्यांनी लंपास केली तिजोरी 

व्यापार्‍याच्या घरात ३५ लाखांच्या ऐवजावर डल्ला; भरदिवसा चोरट्यांनी लंपास केली तिजोरी 

Subscribe

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अन् पोलीस ठाण्यासह आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरील आनंद व्हिला बंगल्यातून चोरट्यांनी सोमवारी (दि.२७) ३५ लाख १५ हजारांचे दागिने, रोकडसह लोखंडी तिजोरीच लंपास केली. विशेष म्हणजे, बंगल्याच्या शेजारी रावसाहेब थोरात सभागृह व प्रवेशव्दारासमोर केटीएमएच विधी महाविद्यालय असतानाही ही घटना घडल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले जात आहे. या भरदिवसा चोरीने दिवसभर शहरात पोलिसांबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. याप्रकरणी व्यापारी रोमेश विजय लुथरा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रोमेश लुथरा यांच्या घरात आईवडील, पत्नी व दोन मुलांसोबत राहतात. राधाबाई व पूनम घरमोलकरीन असून, मुलांना सांभाळण्यासाठी निशा नावाची महिला आहे. रोमेश यांची आई उर्मिल लुथरा यांचा पाय दुखत असल्याने उपचारासाठी सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ दरम्यान रोमेश हे पत्नीसह कॉलेज रोडवरील खासगी रुग्णालयात गेले. त्यावेळी घरी घरकाम करणारी महिला राधाबाई होती. .३० वाजता तिने काम संपल्याने स्वत:च्या घरी जाण्यासाठी मुख्य दरवाजा लॉक करून चावी लेटरबॉक्समध्ये ठेवल्याचे उर्मिल लुथरा यांच्याशी मोबाईलवर संपर्क सांगितले. त्यानुसार ती निघून गेली. सायंकाळी ८.४५ वाजता रोमेश यांची पत्नी घरी आली. त्यानंतर रोमेश रात्री ९.४५ वाजता आईसमवेत घरी आले. त्या बेडरुममध्ये आल्या असता, त्यांनी चावीने लोखंडी कपाट उघडले. त्यांना कपाटात ठेवलेली तिजोरी दिसली नाही. रोमेश यांनी राधाबाईशी संपर्क साधला असता तिने मुख्य दरवाजा बंद केल्याचे सांगितले.

चोरीस गेलेला ऐवज

ऐवज                          रक्कम

- Advertisement -

लोखंडी तिजोरी            15,000

रोख रक्कम                1,00,000

- Advertisement -

महागडी तीन घड्याळे      2,30,000

मंगळसूत्र                     90,000

डायमंड मंगळसूत्र          50,000

सोन्याच्या दागिन्यांचा सेट    8,40,000

सोन्याचा झुमके, कंगण सेट 5,40,000

डायमंड सेट                   5,50,000

सोन्याची माळ                3,00,000

डायमंडच्या चार बांगड्या   8,00,000

एकूण                          ३५, १५, ०००

 

घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून, तपास सुरू केला आहे. चोरटे लॉकरसह फरार झाले आहेत. पोलिसांनी हाताचे ठसे घेतले आहेत. चोरट्यांना मुद्देमालासह लवकरच अटक केली जाईल.

विजय पन्हाळे, पोलीस निरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणे

पाय दुखत असल्याने दिवसभर घरीच असते. उपचारासाठी घराबाहेर जाणे महागात पडले. फिजिओथेरपीसाठी सोमवारी सायंकाळी मुलासह रुग्णालयात गेले होते. घरी आल्यावर कपाट उघडले असता तिजोरी गायब असल्याचे दिसून आले. ही बाब मुलास सांगितले असता त्यानेही पाहणी केली असता त्यालाही तिजोरी दिसली नाही. याप्रकरणी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

उर्मिल लुथरा, घरमालकीन

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -