घरमहाराष्ट्रनाशिकहिंदूहृदयसम्राटांच्या कात्रणांचा संग्रह

हिंदूहृदयसम्राटांच्या कात्रणांचा संग्रह

Subscribe

दत्तात्रेय कोठावदे यांचा २५ वर्षांपासूनचा कात्रणांचा संग्रह

नाशिक : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त दत्तात्रेय कोठावदे यांनी बाळासाहेबांचे दसरा मेळावा भाषण, अनेक वृत्तपत्रांतील लेख, त्यांची व्यंगचित्रे, त्यांचे मार्मिकमधील लेख, फोटो, व्यंगचित्र आणि त्यांच्यासोबतचा पत्रव्यवहार असे १० हजारांहून अधिक छायाचित्रे, वृत्तपत्रे कात्रणं, गेल्या २५ वर्षांपासून राजा सह्याद्रीचा नावाने संग्रहीत केला आहे.

विशेष म्हणजे या संग्रहाचे प्रदर्शन बाळासाहेबांनीच त्यांना मातोश्रीवर बोलावून करत हे प्रदर्शन शिवसैनिकांसाठी खुले ठेवले होते. कोठावदे हे त्यांच्या सर्व सभांना हजर राहात आणि भाषण ऐकल्यानंतर त्यांना पत्र पाठवत, अशातच त्यांची चांगली पत्रमैत्री झाली. बाळासाहेबांनी नाशिकला आल्यावर दत्ता कोठावदेला बोलवून घ्या, असा आदेश दिल्यावर त्यांची भेट होऊन बाळासाहेबांनी संग्रह पाहिला. तेव्हा ते खूश झाले.

- Advertisement -

या सर्व प्रसंगांची आठवण छंदोमयी ग्रुपचे मुख्य प्रसाद देशपांडे, ग्रंथ तुमच्या दारीचे प्रणेते विनायक रानडे, कापूस शिल्पकार अनंत खैरनार, संग्राहक अनंत धामणे, किशोर तिडके, अच्युत गुजराती आणि विविध छंदिष्ट मित्र यांनी केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -