घरमहाराष्ट्रनाशिकशेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Subscribe

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील आरूढ विद्यालयात बारावीत शिकत असलेला अक्षय सुकदेव पडोळ (वय १८) याचा शेततळयात बुडून मृत्यू झाला.

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील आरूढ विद्यालयात बारावीत शिकत असलेला अक्षय सुकदेव पडोळ (वय १८) याचा शेततळयात बुडून मृत्यू झाला. याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अक्षय शनिवारी (1३ एप्रिल) म्हाळसाकोरे-सिन्नर रस्तालगतच्या शेतात कामासाठी गेला होता. काम आटोपून शेततळयावर हातपाय धुण्यासाठी गेला असता, पाय घसरल्याने अक्षय पाण्यात पडला. अक्षयला पोहता येत नसल्याने शेताशेजारील मित्राने आरडाओरडा करून परिसरातील लोकांना मदतीसाठी बोलवले. नागरिकांनी गळाच्या सहाय्याने त्याला पाण्याबाहेर काढले. परंतु, तोपर्यंत उशीर होऊन प्राणज्योत मावळली होती. शनिवारी उशिरा त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षयच्या मागे आई-वडील, मोठा भाऊ, एक बहीण, असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -