घरमहाराष्ट्रनाशिकखून करुन तुरुंगात गेलेल्या आरोपीचा असा झाला शेवट

खून करुन तुरुंगात गेलेल्या आरोपीचा असा झाला शेवट

Subscribe

अंबडचे हॉटेल सोनाली खून प्रकरण : कारागृहात उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका

अंबडच्या सोनाली नामक हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून खून केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या संशयित युवकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. नाशिकरोड पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली.एक महिन्यापूर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँकेजवळील सोनाली हॉटेलमध्ये रात्री पावणेदहाच्या सुमारास प्रसाद भालेराव (२५, रा. देवळाली गाव) हा मित्रांसमवेत जेवण करत असताना येथे किरकोळ कारणावरून अतुल सुभाष पिठेकर (१९, रा. लेखानगर झोपडपट्टी) व साथीदारांनी भालेराव यांचा खून केला होता.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३१/२०२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिठेकर हा कारागृहात होता, त्याला तीन दिवसांपासून त्रास जाणवत होता.त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान,रविवारी (दि.२२) पहाटे सहाच्या सुमारास पिठेकर याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटना समजताच अधीक्षक प्रमोद वाघ यांना माहिती देण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, अधिकारी यांनी कारागृहात भेट देत घटनेची माहिती घेतली. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. न्याहाळे यांनी कारागृहात पंचनामा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -