घरताज्या घडामोडीमालेगावमध्ये वैद्यकीय कर्मचारी वाढविण्याची गरज : भुजबळ

मालेगावमध्ये वैद्यकीय कर्मचारी वाढविण्याची गरज : भुजबळ

Subscribe

 संभाव्य रूग्णसंख्या वाढीची शक्यता लक्षात घेता प्रशासनाची तयारी

मालेगाव शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली करोनाबाधितांची संख्या पाहता येथे डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफची कमतरता भासण्याची शक्यता आहे. म्हणून पूर्वतयारी म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून येथे वैद्यकीय स्टाफ वाढवून देण्याची मागणी केल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर भुजबळ बोलत होते. जिल्ह्यात मालेगाव वगळता ८, तर ग्रामीण भागात ३ असे ११ रूग्ण उपचार घेत आहेत. तर, मालेगाव शहरात ८८ रूग्ण उपचार घेत आहेत. येथे रूग्णसंख्येबरोबरच बळींची संख्याही वाढते आहे. ही चिंतेची बाब आहे. मालेगावात आतापर्यंत जे रूग्ण आढळून आले ते एकमेकांच्या संपर्कातीलच आहेत. त्यामुळे शहरातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत आहेत. मात्र, मालेगावातील करोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेता या बैठकीत काही मुद्द्यांंवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने वैद्यकीय स्टाफ वाढविण्याची गरज समोर आली. कार्यरत आरोग्य कर्मचार्‍यांवर वैद्यकीय सेवेचा ताण आहे. त्यामुळे त्यांना विश्रांती देणेही गरजेचे आहे. परंतु, रूग्णसंख्या वाढली तर त्यांच्यावर उपचार करणेही तितकेच गरजेचे असल्याने याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंशी चर्चा केली असल्याचे भुजबळांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून सुमारे ८०० लोकांवर उपचार करता येतील अशी व्यवस्था मालेगावमध्ये उभारण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदि उपस्थित होते.

धर्मगुरूंशी चर्चा करणार
मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान पर्व लवकरच सुरू होत आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता सोशल डिस्टन्सिंगचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी रमजानच्या काळात घरातच धार्मिक विधी पार पाडावेत, याकरीता मालेगावातील धर्मगुरूंबरोबर स्वतः, तसेच जिल्हाधिकारी चर्चा करत आहेत. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आवाहन केल्याचेही भुजबळांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -